रात्रीच्या वेळी टायर दुकानांचे लॉक तोडून करायचा चोरी
पुणे, (प्रतिनिधी): शहरात पहाटेच्या वेळी टायर दुरुस्ती आणि विक्रीच्या दुकानांचे
लॉक तोडून टायर चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला काळेपडळ पोलिसांनी अटक केली
आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि
रिक्षाच्या नंबरच्या आधारे आरोपीला पकडले असून, त्याच्याकडून ३.५३ लाख रुपयांचे
चोरीचे टायर हस्तगत करण्यात आले आहेत. या
अटकेमुळे पुणे शहरातील अनेक टायर चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत टायर चोरीची
घटना घडल्यानंतर तपास पथकाने तातडीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी सुरू केली. फुटेजमध्ये दिसून आलेल्या रिक्षाचा क्रमांक आणि
आरोपीच्या वर्णनावरून पोलिसांनी आरोपी परवेझ लियाकत काझी (वय ४५, रा. हडपसर) याची
ओळख पटवली. त्याला जैन टाऊनशीप येथून
ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने उंड्री, महंदवाडी, हांडेवाडी आणि लष्कर परिसरातून अशा अनेक चोऱ्या केल्याची कबुली दिली. तो रात्रीच्या वेळी कटावणीचा वापर करून दुकानांचे लॉक तोडायचा आणि नवीन टायर चोरून नेत होता. पोलिसांनी आरोपीकडून ३,५३,१७५ रुपये किमतीचे चोरीचे टायर, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि कटावणी जप्त केली आहे. आरोपीवर काळेपडळ, लष्कर आणि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्री. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे.
- Tyre Theft
- Pune Police
- Arrest
- CCTV Footage
#PunePolice #TyreTheft #CrimeNews #KalepadalPolice #CCTV #Arrest #PuneCity
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा