काळेपडळ पोलीस स्टेशनच्या सतर्कतेने १५ लाखांची चोरी उघडकीस
पुणे, (प्रतिनिधी): मालकाचे तब्बल १५ लाख रुपयांहून अधिक किमतीचे दागिने आणि रोख
रक्कम चोरून फरार झालेल्या चालकाला काळेपडळ पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली
आहे. आरोपी सलमान यासीन पठाण (वय ३२, रा.
ठाणे) हा गुन्हा दाखल झाल्यापासून मोबाईल बंद करून पोलिसांना चकमा देत होता, मात्र
तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पोलिसांनी त्याला ठाणे येथून ताब्यात घेतले.
सलमान पठाण हा फिर्यादीकडे चालक म्हणून नोकरीला
होता. त्याने मालकाकडील मजुरांच्या
पगारासाठी आणलेले पैसे गाडीतून चोरून पोबारा केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो मिरज-सांगली, बीड,
पुणे ग्रामीण आणि मुंबई-ठाणे परिसरात आपले अस्तित्व लपवून फिरत होता. विशेष म्हणजे, तो स्वतःचा मोबाईल न वापरता
अनोळखी व्यक्ती, रिक्षाचालक किंवा हॉटेल वेटर यांच्याकडून तात्पुरता मोबाईल घेऊन
नातेवाईकांशी संपर्क साधत होता. यामुळे
पोलिसांना त्याचा माग काढण्यात अडथळा येत होता.
पोलीस अंमलदार प्रतीक लाहिगुडे यांनी तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून आरोपीचे लोकेशन काढले. या माहितीच्या आधारे तपास पथकाने सापळा रचून त्याला शिळडायघर पोलीस स्टेशन, मुंब्रा, ठाणे येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेला १५,०६,४२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात रोख रक्कम, सोन्याचे दागिने, चारचाकी गाडी आणि मोबाईल फोन यांचा समावेश आहे.
ही कारवाई उपायुक्त राजकुमार शिंदे, सहाय्यक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली
काळेपडळ पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
- Theft Case
- Police Investigation
- Pune Crime
- Kalepadal Police Station
#PunePolice #TheftCase #CrimeNews #KalepadalPolice #DriverArrested #PuneCity #Justice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: