पुणे, दि. ६ ऑगस्ट २०२५: वैकुंठ स्मशानभूमी येथे अनेक वर्षांपासून अंत्यविधी आणि दशक्रिया विधी करणारे गुरुजी आनंद प्रभाकर मोघे (गुरुजी) यांचे वयाच्या ४३ व्या वर्षी शनिवारी (दि. २/८/२५) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने स्मशानभूमी परिसरात आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
आनंद मोघे यांनी अनेक वर्षांपासून वैकुंठ स्मशानभूमी येथे सेवा दिली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक भाऊ आणि एक बहिण असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मोघे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरःशांती देवो, अशा भावना त्यांच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त होत आहेत.
Anand Prabhakar Moghe, Vaikunth Cremation Ground, Obituary, Pune, Guruji.
#AnandMoghe #VaikunthCremationGround #Pune #Obituary #GuruJi

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: