पुणे शहर
बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून सराफाची फसवणूक
पुणे, (प्रतिनिधी) – शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अज्ञात व्यक्तींनी बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून सराफाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. या दोन्ही घटनांमध्ये एकूण १,७५,००० रुपयांची फसवणूक झाली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पहिल्या घटनेत,
धनकवडी येथील एका
२७ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, १९
मार्च २०२५ रोजी
रात्री ८:३०
वाजताच्या सुमारास आंबेगाव खुर्द येथील साळुंखे ज्वेलर्स येथे
एका अज्ञात व्यक्तीने बनावट
सोन्याची चैन खरी असल्याचे भासवून
ती गहाण ठेवली
आणि त्यांच्याकडून १
लाख रुपये घेतले.
या प्रकरणी आंबेगाव पोलीस
ठाण्यात भारतीय न्याय संहिता
कलम ३१८(४)
अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला
असून, पुढील तपास
पोलीस उपनिरीक्षक मोहन
कळमकर करत आहेत.
दुसरी घटना
हडपसर येथील हनुमान
ज्वेलर्समध्ये
घडली. येथे एका
४० वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, १
फेब्रुवारी आणि २५ एप्रिल
२०२५ रोजी दोन
वेगवेगळ्या वेळी एका अज्ञात
व्यक्तीने नकली सोन्याचे दागिने
दुकानात गहाण ठेवले. यातून त्यांनी २
लाख २५ हजार
रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी भारतीय
न्याय संहिता कलम
३१८(४), ३१६(३) नुसार गुन्हा
नोंदवण्यात आला असून, सहायक
पोलीस निरीक्षक अजय
हंचाटे तपास करत
आहेत.
Labels: Crime, Fraud, Pune Police Search Description: Pune
Police registered two separate cases of fraud where jewelers were cheated of Rs
1.75 lakh with fake gold ornaments. A man from Dhankawadi filed a complaint at
Ambegaon Police Station, while a person from Hadapsar was cheated at Hanuman
Jewelers. Hashtags: #PunePolice #Fraud #GoldFraud #CrimeNews #Pune
वाघोली-आव्हाळवाडी रोडवर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
पुणे, (प्रतिनिधी) – वाघोली-आव्हाळवाडी रोडवर झालेल्या एका भीषण अपघातात एका ३३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनचालकाने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात वाहन चालवून हा अपघात घडवला. अपघात घडल्यानंतर चालक घटनास्थळी न थांबता फरार झाला.
ही घटना
१६ ऑगस्ट २०२५
रोजी रात्री ८:४५ वाजताच्या सुमारास वाघोली
गावाच्या हद्दीत हॉटेल न्यू
रॉयल परमिट रुम
बारसमोर घडली. चंद्रपूर येथील
२५ वर्षीय महिलेने या
प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा पती
विश्वनाथ सुभाष मोकलवार (वय
३३) हे वाघोली,
ता. हवेली येथील
शिवराज हाईट्समध्ये राहत
होते. अज्ञात वाहनचालकाने त्यांना जोरदार
धडक दिली, ज्यामुळे ते
गंभीर जखमी झाले
आणि त्यातच त्यांचा मृत्यू
झाला.
वाघोली पोलिसांनी या
प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय
न्याय संहिता कलम
१०६(१), २८१,
१२५(अ), १२५(ब) आणि मोटार
वाहन कायदा १८४,
१३४ (अ)(ब)
नुसार गुन्हा दाखल
केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर राघु
या घटनेचा पुढील
तपास करत आहेत.
Labels: Road Accident, Hit and Run, Pune, Crime Search
Description: A 33-year-old man died in a hit-and-run accident on the
Wagholi-Avhalwadi road in Pune. The driver of an unknown vehicle caused the
accident and fled the scene. Wagholi police have registered a case. Hashtags:
#RoadAccident #HitAndRun #Wagholi #PuneCrime #TrafficSafety
खडकी बाजारपेठेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचा बदाम लंपास
पुणे, (प्रतिनिधी) – खडकी बाजार येथील तिलोक चंदानी दुकानाशेजारील एका ठिकाणी रस्त्याने जात असलेल्या एका २७ वर्षीय महिलेच्या गळ्यातील १५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा बदाम अज्ञात व्यक्तीने जबरीने चोरून नेला. ही घटना १७ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली.
या प्रकरणी, वडगाव
शेरी येथे राहणाऱ्या एका
महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
केली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने तिच्या
मुलीच्या गळ्यातील सोन्याचा बदाम हिसकावून नेला.
घटनेनंतर आरोपी
लगेच पळून गेला.
खडकी पोलिसांनी भारतीय
न्याय संहिता कलम
३०४ (२) अंतर्गत गुन्हा
नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक रविंद्र काळे
या प्रकरणाचा पुढील
तपास करत आहेत.
Labels: Chain Snatching, Robbery, Pune Crime, Khadki Police Search
Description: A 27-year-old woman's gold pendant worth Rs 15,000 was
snatched in a robbery near Tilok Chandani's shop in Khadki, Pune. Khadki police
have registered a case and are investigating. Hashtags: #ChainSnatching
#Robbery #Khadki #PuneCrime #StreetCrime
वाघेश्वर उद्यानात नवजात अर्भक आढळले
पुणे, (प्रतिनिधी) – वाघेश्वर उद्यान, वाघोली येथे एका अज्ञात महिलेने ५ ते ६ दिवसांच्या पुरुष अर्भकास उघड्यावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना १७ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ६ ते ७:३० वाजताच्या दरम्यान घडली.
याबाबत वाघोली
पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत महिला
पोलीस अंमलदार सोनाली
तनपुरे यांनी फिर्याद दाखल
केली आहे. अज्ञात महिलेने बाळाचा
सांभाळ करण्याचा परित्याग केला
असून, जन्माची माहिती
लपवण्यासाठी आणि परस्पर विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने त्याला
तिथे सोडले असल्याचे फिर्यादीत नमूद
करण्यात आले आहे.
वाघोली पोलिसांनी भारतीय
न्याय संहिता कलम
९३ अंतर्गत गुन्हा
दाखल केला आहे.
सहायक पोलीस
निरीक्षक विनायक आहिरे या
घटनेचा तपास करत
आहेत.
Labels: Child Abandonment, Crime Against Children, Pune, Social
Crime Search Description: A shocking incident of child abandonment has been
reported in Wagholi, Pune, where an unknown woman left a 5-6 day old male
infant in Wagheshwar Garden. Wagholi police have registered a case under the
Indian Justice Code. Hashtags: #ChildAbandonment #Wagholi #CrimeNews
#PunePolice #Infant
वडगाव शेरी येथे ज्वेलर्सला १.९८ लाखांचा गंडा; चार अज्ञात आरोपींवर गुन्हा
पुणे, (प्रतिनिधी) – चंदननगर येथील एका ज्वेलर्सची एकूण १ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीच्या बहाण्याने चार अनोळखी इसमांनी ही फसवणूक केली.
वडगाव शेरी
येथे राहणाऱ्या एका
४३ वर्षीय व्यक्तीने चंदननगर पोलीस
ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली
आहे. १३ जुलै
२०२५ रोजी 'सावलिया ज्वेलर्स अँड
सराफ' येथे चार
अज्ञात व्यक्ती सोन्याची चेन
विकण्याच्या बहाण्याने आल्या. त्यांनी दुकानाच्या कर्मचाऱ्याचा विश्वास संपादन
करून खोटे दागिने
खरे असल्याचे भासवले
आणि ८५ हजार
रुपये घेऊन पळ
काढला.
दुसऱ्या दिवशी,
१४ जुलै रोजी
आणखी दोन अनोळखी
व्यक्ती दुकानात आल्या. त्यांनी सोन्याचे ब्रेसलेट विकण्याच्या बहाण्याने दुकानातून १
लाख १३ हजार
रुपयांची सोन्याची चेन खरेदी केली.
चार-पाच
दिवसांत पैसे परत करतो,
असा विश्वास देऊन
त्यांनी खोटे सोन्याचे ब्रेसलेट दिले
आणि पैसे न
देता निघून गेले.
या दोन्ही
घटनांमध्ये ज्वेलर्सची फसवणूक झाली असून,
भारतीय न्याय संहिता
कलम ३१६(२),
३१८(२), ३(५) अंतर्गत चंदननगर पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. पोलीस उपनिरीक्षक राऊत
या प्रकरणाचा पुढील
तपास करत आहेत.
Labels: Gold Fraud, Cheating, Pune Crime, Jewelers Search
Description: A jeweler in Wadgaon Sheri, Pune, was cheated of Rs 1.98 lakh
in two separate incidents. Four unknown individuals used fake gold ornaments to
defraud the jeweler. A case has been registered at Chandan Nagar Police
Station. Hashtags: #GoldFraud #JewelerCheated #PuneCrime #WadgaonSheri
#ChandanNagarPolice
पिंपरी-चिंचवड
हॉटेलमध्ये पूर्ववैमनस्यातूनतरुणावर हल्ला, डोक्यात बिअरची बाटली मारून जीवे मारण्याचा प्रयत्न
पिंपरी-चिंचवड, (प्रतिनिधी) – पुण्यातील चिंचवड येथील ऑरा हॉटेलमध्ये पूर्ववैमनस्यातून तीन आरोपींनी एका २५ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी पीडित तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली आणि ग्लास मारून त्याला गंभीर जखमी केले.
ही घटना
१७ ऑगस्ट २०२५
रोजी दुपारी १२:५५ वाजता ऑरा
हॉटेल, स्पाइन रोड,
पूर्णानगर, चिंचवड येथे घडली.
सूरज रामदास
घोडे (वय २५,
रा. चिखली) हे
त्यांच्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये दारू पित असताना
आरोपी आशुतोष सुदाम
कदम, राजा युवराज
हजारे आणि शैलेश
शाम गायकवाड उर्फ
बन्या यांनी तिथे
येऊन त्यांच्यावर हल्ला
केला.
आरोपी आशुतोष
कदम याने फिर्यादीला "मी जेलमधून बाहेर
आल्यापासून तुला बघतोय, तू
जास्त शहाणपणा करतोयस,
तुला आता जिवंत
सोडत नाही" असे म्हणत
कानशिलात मारली. त्यानंतर त्याने
टेबलावरील ग्लास आणि दारूची
बॉटल फिर्यादीच्या डोक्यात मारून
त्याला जखमी केले.
फिर्यादीचे मित्र
त्याला वाचवण्यासाठी आले
असता आरोपी राजा
हजारे यानेही बिअरची
बाटली डोक्यात मारली.
आरोपींनी "आम्ही इथले
भाई आहोत" असे म्हणत
परिसरात दहशत माजवली. चिखली पोलिसांनी या
प्रकरणी भारतीय न्याय संहिता
कलम १०९, ३
(५), क्रिमिनल लॉ
अमेंडमेंट कायदा कलम ३,
७ अंतर्गत गुन्हा
दाखल केला असून,
आरोपींना अटक करण्यात आली
आहे.
Labels: Assault, Attempted Murder, Pimpri Chinchwad, Crime Search
Description: Three individuals were arrested for a brutal assault on a
25-year-old man at Aura Hotel in Chinchwad, Pune. The accused, who are now in
custody, allegedly attacked the victim with a beer bottle and glass over a
previous dispute. Hashtags: #PimpriChinchwad #Assault #CrimeNews
#Chinchwad #Pune
शिरगाव येथे पिस्तुलाचा धाक दाखवून तरुणाची लूट
पिंपरी-चिंचवड, (प्रतिनिधी) – शिरगाव-परंदवडी रोडवर एका तरुणाला अडवून पिस्तूलचा धाक दाखवून १ हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली आहे. आरोपीने पीडिताच्या मदतीला येणाऱ्या लोकांनाही पिस्तूल दाखवून धमकावले.
ही
घटना १६ ऑगस्ट
२०२५ रोजी रात्री
९:१० वाजताच्या सुमारास उर्से
ते परंदवडी रोडवर
के.एल.टी.
कंपनीजवळ घडली.
निखिल उत्तम
बेरगळ (वय २०,
रा. विठ्ठलवाडी, मावळ)
हे पायी जात
असताना आरोपी ऋषिकेश
उर्फ शे-या
राजू अडागळे (वय
२४, रा. उर्स,
मावळ) याने त्यांना अडवले.
आरोपीने फिर्यादीला मारहाण
करून त्याच्या पॅन्टच्या खिशातील १
हजार रुपये रोख
रक्कम असलेले पाकीट
काढून घेतले. त्यानंतर त्याने फिर्यादीला शिवीगाळ करत
धमकावले आणि मदत करायला
आलेल्या लोकांनाही पिस्तूल दाखवून दहशत निर्माण केली.
शिरगाव पोलिसांनी भारतीय
न्याय संहिता कलम
३०९(६), १२६(२), ११५(२),
३५२, ३५१(२)
आणि भारतीय शस्त्र
कायदा ३(२५),
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम
३७(१)(३)
सह १३५, क्रिमिनल लॉ
अमेंडमेंट कायदा ७ नुसार
गुन्हा दाखल केला
असून, आरोपीला अटक
करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक पारखे
या प्रकरणाचा पुढील
तपास करत आहेत.
Labels: Robbery, Armed Robbery, Pimpri Chinchwad, Crime Search
Description: A 20-year-old man was robbed of Rs 1,000 at gunpoint on the
Urse-Parandwadi road in Pimpri-Chinchwad. The accused, Rishikesh aka Sherya
Adagale, threatened the victim and others with a pistol. He has been arrested
by Shirgaon police. Hashtags: #Robbery #ArmedRobbery #PimpriChinchwad
#CrimeNews #Shirgaon
लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवून २.८१ लाखांचा गंडा
पिंपरी-चिंचवड, (प्रतिनिधी) – दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लॉन्ड्री व्यवसायिकाची लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने २ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने फिर्यादीचा विश्वासघात करून पैसे परत न करता जीवे मारण्याची आणि अॅट्रॉसिटीच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली.
भरत पाडुरंग काळे
(वय ३६, रा.
विकासवाडी, धानोरे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही
घटना १० मार्च
ते २५ मार्च
२०२५ दरम्यान आराध्या लॉन्ड्री, आझादनगर, च-होली फाटा येथे
घडली. आरोपी बाळासाहेब हंगारगे याच्या
सांगण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने रोख
आणि गुगल पे
द्वारे एकूण २,८१,५०० रुपये
लोन मिळवण्यासाठी दिले.
मात्र आरोपीने पैसे
परत केले नाहीत
किंवा लोनही मंजूर
केले नाही.
या प्रकरणी दिघी
पोलीस ठाण्यात भारतीय
न्याय संहिता कलम
३१८(४), ३१६(२), ३५१(२),
(३) अंतर्गत गुन्हा
दाखल करण्यात आला
आहे. महिला पोलीस
उपनिरीक्षक भोईर या प्रकरणाचा तपास
करत आहेत.
Labels: Fraud, Cheating, Pimpri Chinchwad, Financial Crime Search
Description: A laundry business owner in Dighi, Pimpri-Chinchwad, was
cheated of Rs 2.81 lakh by an individual who promised to get him a loan. The
accused also threatened to kill the victim and frame him in an Atrocity case. Hashtags:
#Fraud #Cheating #Dighi #PimpriChinchwad #FinancialCrime
महिंद्रा कंपनीत कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी, कोयत्याने केले वार
पिंपरी-चिंचवड, (प्रतिनिधी) – चिंचवड येथील महिंद्रा कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ वादातून मारामारी झाली असून, आरोपींनी कोयत्याने हल्ला करून दोघांना जखमी केले. ही घटना १६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ५:१५ वाजताच्या सुमारास घडली.
सोहेल चुन्ना
खान (वय ३७,
रा. आकुर्डी) यांनी
दिलेल्या फिर्यादीनुसार,
ते आणि आरोपी
एकाच कंपनीत काम
करतात. कंपनीतील लाईट
गेल्यावर परत आल्यावर फिर्यादीने कॉम्प्रेसर चालू
केला. त्यावेळी आरोपी
सुरज सरोदे (वय
२५) याने "कॉम्प्रेसर चालू
कर, हवा येत
नाही" असे म्हटले. फिर्यादीने "मी कॉम्प्रेसर चालू
केलेला आहे" असे उत्तर
दिल्यावर सुरजने उलट का
बोलतोस असे म्हणत
वाद सुरू केला.
त्यानंतर त्याने
प्रतिक उबाळे, अंशु
रोकडे आणि प्रथमेश यांना
बोलावून घेतले.
या चौघांनी मिळून
फिर्यादीला मारहाण केली आणि
आरोपी प्रथमेशने सोबत
आणलेल्या कोयत्याने भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या गाझी
शेख आणि चांद
शेख या मित्रांच्या हाताला
मारून त्यांना जखमी
केले. आरोपींनी फिर्यादीला जीवे
मारण्याची धमकीही दिली. निगडी पोलिसांनी भारतीय
न्याय संहिता कलम
११४(१), १२६(२), ३४७, ३५२(१), ३(४),
भारतीय शस्त्र अधिनियम १९५९
कलम ४(२५)
आणि महाराष्ट्र पोलीस
कायदा कलम ४(२५) अंतर्गत गुन्हा
दाखल केला आहे.
तपास पोलीस
उपनिरीक्षक भिंगारदिवे करत आहेत.
Labels: Assault, Workplace Violence, Pimpri Chinchwad, Crime Search
Description: A dispute over a compressor at a company in Chinchwad,
Pimpri-Chinchwad, escalated into a violent altercation. Four accused
individuals allegedly assaulted a fellow employee and injured two of his
friends with a 'koyta' (sickle). Hashtags: #WorkplaceViolence
#PimpriChinchwad #CrimeNews #Assault #Nigdi
अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकास अटक
पिंपरी-चिंचवड, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून ५१ हजार रुपये किमतीचे लोखंडी पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई
१७ ऑगस्ट २०२५
रोजी रात्री ९:१५ वाजताच्या सुमारास राजमाता जिजाऊ
कॉलेजच्या मागील मैदानाजवळ, टेल्को
रोड, भोसरी येथे
करण्यात आली. पिंपरी-चिंचवड
पोलीस आयुक्तांनी शहरातील शस्त्र
बाळगण्यावर बंदी घातलेली असतानाही आरोपी
अक्षय संजय गुंड
(वय २८, रा.
भोसरी) याने या
आदेशाचे उल्लंघन केले. मालमत्ता गुन्हे
विरोधी पथकाचे पोलीस
शिपाई हर्षद जयवंत
कदम यांनी याबाबत
फिर्याद दिली. आरोपीकडे शस्त्र
बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नव्हता.
भोसरी पोलीस
ठाण्यात आरोपीविरुद्ध आर्म्स ॲक्ट कलम
३, २५ आणि
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ३७(१)(३) सह १३५
नुसार गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक टापरे
पुढील तपास करत
आहेत.
Labels: Illegal Weapons, Pimpri Chinchwad, Arrest, Bhisari Police Search
Description: A man named Akshay Sanjay Gund was arrested in Bhosari,
Pimpri-Chinchwad, for illegally possessing a pistol and a live cartridge. The
weapons, worth Rs 51,000, were seized during the raid. Hashtags:
#IllegalWeapons #PistolSeized #PimpriChinchwadPolice #Bhosari #CrimeNews
हद्दपार गुन्हेगार शहरात आढळला, कोयता बाळगल्याप्रकरणीही गुन्हा
पिंपरी-चिंचवड, (प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्यातून हद्दपार केलेला एक गुन्हेगार पुन्हा शहरात दाखल झाल्याचे समोर आले आहे. आरोपीला आळंदी बायपास रोडवर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडे बेकायदेशीरपणे कोयताही आढळून आला आहे.
आळंदी पोलीस
ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई नारायण
धनाजी सूर्यवंशी यांनी
या प्रकरणी फिर्याद दिली
आहे. आरोपी श्रीधर
केशव कदम (वय
३०, रा. धानोरे,
ता. खेड) याला
पुणे जिल्हा हद्दीतून २४
महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले होते. हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून तो १७
ऑगस्ट २०२५ रोजी
रात्री ८:१०
वाजताच्या सुमारास चऱ्होली बायपास रोड, प्लमेरीया मंगल
कार्यालयासमोर
आढळला.
पोलिसांनी तपासणी
केली असता, त्याच्याकडे ३००
रुपये किमतीचा एक
लोखंडी धारदार कोयता
मिळून आला, ज्यासाठी त्याच्याकडे कोणताही परवाना
नव्हता. आळंदी पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस
अधिनियम १९५१ कलम १४२,
भारतीय शस्त्र अधिनियम कलम
४(२५) आणि
महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम
३७(१)(३),
१३५ नुसार गुन्हा
दाखल केला आहे.
पोलीस हवालदार दोडके
या प्रकरणाचा तपास
करत आहेत.
Labels: Criminal, Extradited Criminal, Pimpri Chinchwad, Crime Search
Description: A criminal, Sridhar Keshav Kadam, who was banished from Pune
district for 24 months, was arrested again in Alandi for violating the order.
Police also found a 'koyta' (sickle) in his possession. Hashtags:
#CriminalArrest #Extradited #AlandiPolice #PimpriChinchwad #IllegalWeapons

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: