पिंपरी, (प्रतिनिधी): करिअरच्या संधी शोधताना विद्यार्थ्यांनी केवळ मोठे आर्थिक पॅकेज देणाऱ्या कंपन्यांना प्राधान्य न देता, ज्या कंपन्यांमध्ये नवीन गोष्टी शिकण्याची आणि अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळेल, अशा ठिकाणी नोकरी शोधावी, असे मत क्विक हिल टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक कैलाश काटकर यांनी व्यक्त केले. चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळ्यानंतर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.
आपल्या उद्योजकीय प्रवासाची वाटचाल सांगताना काटकर म्हणाले की, स्क्रीन प्रिंटिंग आणि रेडिओ दुरुस्तीसारख्या कामांपासून सुरुवात करून अँटीव्हायरस सोल्यूशन्स विकसित करण्यापर्यंतचा आणि क्विक हिल कंपनी सुरू करण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी उलगडला. 'यशोगाथा' या विशेषांकाचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, टी-शर्ट पेंटिंग स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
यावेळी 'यशस्वी' संस्थेचे संचालक राजेश नागरे, मनुष्यबळ व्यवस्थापक श्रीकांत मिरजकर यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कैलाश काटकर यांचा जीवनप्रवास ऐकून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Kailash Katkar
Quick Heal Technologies
Career Guidance
Students
Pune Event
#KailashKatkar #QuickHeal #CareerAdvice #Pune #Students #IndependenceDay

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: