पुण्यात मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्याला अटक; तब्बल ५ वाहने जप्त
पुणे - पुणे
शहर पोलीस अंतर्गत समर्थ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने एका
सराईत दुचाकी चोरट्याला अटक
केली असून, त्याच्याकडून चोरीच्या ५
दुचाकी जप्त करण्यात आल्या
आहेत. आरोपीने मौजमजेसाठी या
गाड्या चोरल्याची कबुली
दिली आहे. या कारवाईमुळे पुणे
शहरातील इतर दोन वाहन
चोरीचे गुन्हे देखील
उघडकीस आले आहेत.
समर्थ पोलीस
ठाण्यात २७ जुलै
ते २८ जुलै
२०२५ या कालावधीत एका
यमाहा कंपनीच्या दुचाकी
चोरीची तक्रार दाखल
झाली होती. या गुन्ह्याचा तपास
करताना, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे
यांच्या नेतृत्वाखालील
पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज
तपासले आणि गोपनीय
माहितीच्या आधारे सुजल जितेश
जगताप (वय २२)
या संशयिताला ताब्यात घेतले.
आरोपी जगताप
याला कात्रज परिसरात सापळा
रचून पकडण्यात आले.
त्याच्या ताब्यातून चोरीची
यमाहा दुचाकी जप्त
करण्यात आली व त्याला
३ ऑगस्ट २०२५
रोजी अटक करण्यात आली.
पुढील तपासणीत त्याने
आपल्या एका अल्पवयीन मित्राच्या मदतीने
यापूर्वीही पुणे
शहरातून अनेक वाहने चोरल्याचे कबूल
केले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या आणखी
४ दुचाकी जप्त
केल्या आहेत. यामध्ये बंडगार्डन आणि कोंढवा पोलीस
ठाण्यातील प्रत्येकी एक वाहन चोरीचा
गुन्हा उघडकीस आला
आहे.
ही कारवाई उपनिरीक्षक जालिंदर फडतरे यांच्यासह संतोष पागार, रविंद्र औचरे, रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे आणि भाग्येश यादव यांनी केली.
Crime, Police Action, Vehicle Theft, Pune
#PunePolice #CrimeNews #VehicleTheft #Pune #SamarthPoliceStation #MotorcycleTheft #Arrested

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: