पिंपरी-चिंचवड, १ ऑगस्ट २०२५: पिंपरी कॅम्प मार्केट परिसरात आज दुपारी १ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात हल्लेखोराने एका व्यापाऱ्यावर गोळीबार केला. आरोपीने व्यापाऱ्याला गंभीर जखमी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लुटून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नेमकी घटना
भावेश कंकराणी असे जखमी व्यापाऱ्याचे नाव असून, ते आपल्या दुकानासमोर असताना ही घटना घडली. गोळी लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी पिंपरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले.
गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याची मागणी
या घटनेनंतर माजी नगरसेवक संदीप वाघेरे, डब्बू आसवानी यांनी पोलिसांकडे आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. डब्बू आसवानी यांनी सांगितले की, "पिंपरीमध्ये अशा प्रकारच्या घटना वाढल्या आहेत, ज्या थांबायला पाहिजेत." संदीप वाघेरे यांनीही ही घटना गंभीर असून गुन्हेगारांवर कठोर शासन करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला लवकरच अटक करून गुन्हेगारांवर ‘मोका’, ‘तडीपार’ किंवा ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
Pimpri Chinchwad, Pimpri Camp Market, Firing, Robbery, Bhavesh Kankaria, Sandeep Waghere, Crime, Police Investigation, Chain Snatching, Pimpri Chinchwad News.
#PimpriChinchwad #Firing #Robbery #Crime #PimpriPolice #MarketArea #MaharastraNews #Safety.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: