पक्ष मजबूत करण्यासाठी तळागाळात जाऊन संघटना बांधणी करण्याचे आवाहन
बीड, (प्रतिनिधी): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा, असा आदेश देत महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बीडमधील शिवसैनिकांमध्ये प्रचंड जोश निर्माण केला. बीड शहरातील हॉ. ग्रँड यशोदा येथे झालेल्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले.
या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेना सचिव संजय मोरे, भाऊसाहेब चौधरी, उपनेते राहुल शेवाळे, अर्जुन खोतकर, अशोक पटवर्धन, बापूसाहेब मोरे, अनिल जगताप, सचिन मुळूक, स्वप्नील गलधर, संगीता चव्हाण यांसारखे महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक आणि स्वप्नील गलधर यांनी बीड जिल्ह्याचा आढावा सादर केला. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणुकांबाबत ध्येय-धोरणे ठरवण्यात आली. यावेळी नेत्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत पूर्ण ताकदीने आहेत. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटना मजबूत करण्यावर आणि सदस्य नोंदणीवर अधिक काम करावे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवायलाच पाहिजे, असा ठणठणीत आदेश देत त्यांनी निवडणुकांचे रणशिंग फुंकले.
Shiv Sena
Beed Politics
Uday Samant
Local Body Elections
Eknath Shinde
#ShivSena #UdaySamant #Beed #LocalElections #EknathShinde #MaharashtraPolitics
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: