पीओपी मूर्तींवर लाल रंगाचे चिन्ह करणे बंधनकारक
घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावातच
नैसर्गिक शाडू
माती / चिकणमातीपासून मूर्ती
बनवण्याचे निर्देश
पुणे, (प्रतिनिधी): पुणे महानगरपालिकेने (मनपा)
'पर्यावरणपूरक गणेशोत्सव २०२५' साजरा करण्याकरिता सुधारित मार्गदर्शक सूचना
जाहीर केल्या आहेत.
या सूचना
मार्च २०२६ पर्यंत
साजऱ्या होणाऱ्या सर्व सण-उत्सवांसाठी लागू
असतील. या मार्गदर्शक सूचनांमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांचाही समावेश
आहे.
यानुसार, प्लास्टर ऑफ
पॅरीस (पीओपी) मूर्तीचे उत्पादक आणि
विक्रेते यांनी मूर्तीच्या मागील
बाजूस ऑईल पेंटने
लाल रंगाचे गोल
चिन्ह करणे अनिवार्य आहे.
तसेच, पीओपी
मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकार व
विक्रेत्यांना
विक्रीची नोंदवही ठेवणे बंधनकारक राहील.
मूर्ती विसर्जनासाठी महत्त्वाच्या सूचना:
- पीओपीपासून
बनवलेल्या घरगुती उत्सवांच्या आणि सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या सर्व मूर्ती केवळ कृत्रिम तलावातच विसर्जित कराव्यात.
- सार्वजनिक
मंडळांच्या सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तींसाठी विसर्जनासाठी इतर पर्याय उपलब्ध नसल्यास नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्याची परवानगी असेल. अशा मंडळांनी
विसर्जनासाठी प्रतिकात्मक लहान मूर्तींचा वापर करावा आणि मुख्य मूर्ती पुढील वर्षीही वापरावी.
मूर्ती आणि सजावटीसाठी नियम:
- मूर्ती केवळ नैसर्गिक
जैवविघटनशील पर्यावरणास अनुकूल कच्चा माल, जसे की शाडू माती किंवा चिकणमाती वापरून तयार करावी. पीओपी, प्लास्टिक,
आणि थर्माकोलचा वापर करण्यास मनाई आहे.
- मूर्ती रंगवण्यासाठी
पर्यावरणास अनुकूल पाणी-आधारित, जैवविघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक रंगांचा वापर करावा. विषारी रासायनिक
रंग, ऑईल पेंट्स आणि कृत्रिम रंगांवर आधारित पेंट्स वापरण्यास सक्त मनाई आहे.
- विसर्जनापूर्वी
इतर निर्माल्य कृत्रिम तलावाजवळ स्वतंत्रपणे गोळा करून त्यावर प्रक्रिया करावी.
पुणे महानगरपालिकेने सर्व
नागरिकांना आवाहन केले आहे
की, या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन
करणाऱ्या मूर्तिकारांकडूनच
मूर्ती खरेदी करावी
आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा
करण्यासाठी सहकार्य करावे.
- Pune
- Ganesh Festival
- Eco-friendly
- PoP Idols
- PMC
- Maharashtra
#PuneGaneshotsav #EcoFriendlyGanesha #Pune #GaneshFestival #PoPIdols #PMC

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: