रविवार, २४ ऑगस्ट, २०२५

सांस्कृतिक कार्यक्रमांतून संस्कृती जतन होते : आमदार उमा खापरे

 

चिंचवड प्राधिकरण भाजप मंडलाच्या श्रावण महोत्सवाला उदंड प्रतिसाद

भजन आणि मंगळागौर स्पर्धेत विजेत्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरव

पिंपरी, (प्रतिनिधी): हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावणात साजऱ्या होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून पुढच्या पिढीसाठी संस्कृती जतन करण्यासाठी मार्गदर्शन मिळते, असे मत आमदार उमा खापरे यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्ष चिंचवड प्राधिकरण मंडलाच्या वतीने आयोजित श्रावण महोत्सवाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

सावरकर भवन येथे आयोजित या महोत्सवात भजन स्पर्धा, मंगळागौर खेळ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि विजेत्या ठरलेल्या संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.

यावेळी भाजपचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी आमदार अश्विनी जगताप, माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. स्पर्धेसाठी ज्ञानेश्वर इटकर, विनिता जोशी, प्रविण कुरळकर, विद्या दंडवते, प्राजक्ता निफाडकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे:

  • भजन स्पर्धा:

    • प्रथम क्रमांक: गजानन भजनी मंडळ, प्राधिकरण; गायत्री भजनी मंडळ, चिंचवड

    • द्वितीय क्रमांक: सुखदा भजनी मंडळ, प्राधिकरण; स्वर शांती भक्ती मंडळ, प्राधिकरण

    • तृतीय क्रमांक: गुरूदत्त भजनी मंडळ, देहूगाव; दत्त प्रासादिक भजनी मंडळ, प्राधिकरण

  • मंगळागौर खेळ:

    • प्रथम क्रमांक: शालिनी ग्रुप

    • द्वितीय क्रमांक: संस्कृती ग्रुप

    • तृतीय क्रमांक: सिद्धलक्ष्मी ग्रुप

    • उत्तेजनार्थ: रणरागिणी ग्रुप



  • Uma Khapare

  • Shravan Mahotsav

  • Cultural Event

  • Pimpri

  • BJP

#UmaKhapare #ShravanMahotsav #Pimpri #BJP #CulturalEvent

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा