पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ड्रोन वापरून हातभट्टी दारूअड्ड्यांवर छापा

 


१६ गुन्हे दाखल, ३६,७३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त 

परिमंडळ ४ मध्ये अवैध दारूविक्रीवर अंकुश ड्रोन व विशेष पथकाद्वारे मोहीम यशस्वी

पुणे : पुणे शहर पोलीस परिमंडळ ४ च्या हद्दीतील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४ श्री. सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार, दि. १६/०८/२०२५ रोजी पहाटेपासून 'मासरेड'चे आयोजन करण्यात आले होते.

या मोहिमेत ड्रोनचा वापर करून डोंगराळ आणि नदी परिसरात लपून-छपून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर तसेच देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण १६ लोकांवर कारवाई करत १६ गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी ३६,७३५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, ज्यात ३१८ लिटर गावठी हातभट्टी दारू (किंमत ₹३१,६३०) आणि ६.६०० लिटर देशी दारू (किंमत ₹२,९६०) यांचा समावेश आहे.

या कारवाईसाठी २३ पोलीस अधिकारी, ६८ पोलीस अंमलदार, एक एम.एस.व्ही. व्हॅन आणि ड्रोनचा वापर करण्यात आला. अपर आयुक्त  मनोज पाटील,   उपआयुक्त  सोमय मुंडे, सहाय्यक आयुक्त  प्रांजली सोनवणे, आणि विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.


  • Pune Police

  • Crime

  • Illegal Liquor

  • Drone Operation

  • Law Enforcement

#PunePolice #IllegalLiquor #DroneOperation #Crime #MassRaid #Pune

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ड्रोन वापरून हातभट्टी दारूअड्ड्यांवर छापा पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ड्रोन वापरून हातभट्टी दारूअड्ड्यांवर छापा Reviewed by ANN news network on ८/१८/२०२५ ०९:४५:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".