अंमली पदार्थ गोदामावर पोलिसांचा छापा; ४३४.९७ कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबईत पवईतील गोदामावर साकीनाका पोलिसांची कारवाई

मुंबई(प्रतिनिधी): मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर टोळीचा पर्दाफाश करतपवई येथील एका गोदामावर छापा टाकून तब्बल ४४ कोटी रुपये किमतीचे मेफेड्रॉन (एमडीहे अंमली पदार्थ जप्त केले आहेतविशेष म्हणजेहे गोडाऊन रंगाचे गोडाऊन असल्याचे भासवून त्यामागे अंमली पदार्थांचे उत्पादन आणि साठा केला जात होताआतापर्यंत या प्रकरणातील एकूण  आरोपींना अटक करण्यात आली असूनपोलिसांनी एकूण २१४ किलो वजनाचे एमडी अंमली पदार्थ आणि ते बनवण्यासाठी लागणारे रसायन असा ४३४ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  या प्रकरणाची सुरुवात साकीनाका पोलीस ठाण्यात २४ एप्रिल २०२५ रोजी दाखल झालेल्या एका अंमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यापासून झाली होती या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच तीन आरोपींना अटक केली होती आणि वसई, पालघर येथून किलो ५३ ग्रॅम वजनाचा एमडी आणि तो बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले होते, ज्याची किंमत सुमारे कोटी लाख रुपये होती.   

या प्रकरणाच्या सखोल तपासादरम्यान, २६ जुलै २०२५ रोजी पोलिसांनी म्हैसूर, कर्नाटक येथून एका आरोपीला अटक केली. त्याच्या चौकशीतून पवई येथील प्रथमेश गॅलेक्सी येथील एका दुकानात अंमली पदार्थांचे गोडाऊन असल्याचे उघड झाले. ३० जुलै २०२५ रोजी पोलिसांनी या गोदामावर छापा टाकला असता, तिथे रंगांच्या गोदामाच्या नावाखाली २१.९०३ किलो ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी), ब्रोम मिथाईल प्रोपिओफेनॉन केमिकल (१५९ किलो) आणि मोनोमिथिलामाईन केमिकल (३७६ किलो) असा एकूण ४३४.९७ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.   


·         Drugs Bust

·         Mumbai Police

·         Sakinaka Police Station

·         Drugs Seizure

 #MumbaiPolice #DrugBust #MDdrugs #SakinakaPolice #CrimeNews #DrugsRacket #PoliceRaid


अंमली पदार्थ गोदामावर पोलिसांचा छापा; ४३४.९७ कोटींचा मुद्देमाल जप्त अंमली पदार्थ गोदामावर पोलिसांचा छापा; ४३४.९७ कोटींचा मुद्देमाल जप्त Reviewed by ANN news network on ८/०१/२०२५ ०२:५१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".