शुक्रवार, १ ऑगस्ट, २०२५

गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने आलेल्या तरुणाला क्राईम ब्रँचने पकडले

 


पुणे क्राईम ब्रँचने जुना मोटर स्टँड परिसरातून पकडले

पुणे, (प्रतिनिधी): शहरात घातक शस्त्र बाळगून गंभीर गुन्हेगारी कृत्य करण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१ ने अटक केली आहे.  जुना मोटर स्टँड, भवानी पेठ परिसरातून पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि सहा हजार रुपये किमतीचे सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.  ही कारवाई पोलीस अंमलदार अनिकेत बाबर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली.  

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै २०२५ रोजी पोलीस अंमलदार अनिकेत बाबर यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, जितू रवी मंडलिक (वय २०, रा. कोंढवा, पुणे) नावाचा एक तरुण जुना मोटर स्टँड, भवानीपेठ येथे अग्निशस्त्र घेऊन थांबला आहे.  त्याला ताब्यात घेऊन त्याच्या नावाची खात्री केल्यावर पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली.  यावेळी, त्याच्या पॅन्टच्या कमरेला चाळीस हजार रुपयांचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि पॅन्टच्या खिशात सहा हजार रुपयांची सहा जिवंत काडतुसे सापडली.  

 या गंभीर गुन्ह्याप्रकरणी आरोपी जितू मंडलिक याच्या विरोधात खडक पोलीस स्टेशनमध्ये आर्म ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कामगिरी उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्तराजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक कुमार घाडगे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.  


  • Crime News
  • Pune Police
  • Illegal Arms
  • Arrest

 #PunePolice #CrimeBranch #IllegalArms #Arrest #PuneNews #Firearms #CrimeInPune #Pune



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा