पुणे, ५ ऑगस्ट २०२५: भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्हायोलिन गाते तेव्हा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमात व्हायोलिन वादनातून हिंदी आणि मराठी गाण्यांचा सुरेल संगम सादर केला जाणार आहे.
स्थळ: सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, भारतीय विद्या भवन, शिवाजीनगर, पुणे.
प्रस्तुती: सौ. चारुशीला गोसावी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम सादर होणार आहे.
कलाकार: कार्यक्रमाला अमृता दिवेकर (सिंथेसायझर), प्रसन्न बाम (हार्मोनियम), अभिजित जायदे (तबला), उद्धव कुंभार (तालवाद्य) आणि वैष्णवी काळे (व्हायोलिन साथ) यांची साथसंगत असणार आहे. सूत्रसंचालन सौ. प्राची घोटकर करतील.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.
Violin Gate Tevha, Bharatiya Vidya Bhavan, Infosys Foundation, Pune, Cultural Event, Violin Concert, Charushila Gosavi, Nandanar Kakirde.
#PuneEvents #ViolinGateTevha #BharatiyaVidyaBhavan #InfosysFoundation #Pune #MusicConcert #CulturalProgram

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: