किरीट सोमय्या यांचे फरासखाना पोलिसांना पत्र; मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाईची मागणी

 

पुणे, (प्रतिनिधी): भाजप नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी काल पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनला भेट देऊन त्या परिसरात असलेल्या मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर आणि ध्वनी प्रदूषणावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी फरासखाना पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना एक पत्रही दिले आहे. यावेळी शहरातील भाजपचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. सोमय्या यांनी पत्रात म्हटले आहे की, मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी २०२५ मध्ये मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या संदर्भात अंतिम आदेश दिले होते. या आदेशात ध्वनीची मर्यादा ५० डेसिबलपेक्षा जास्त असू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी "भोंगे चालणार नाहीत" अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. मुंबईत 'भोंगा मुक्त मुंबई' मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली होती.

पुण्यात मोठ्या प्रमाणात मशिदींवर अनधिकृत भोंगे असून, त्यामुळे तीव्र ध्वनी प्रदूषण होत असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. अनेक मशिदींच्या ट्रस्टींनी लाऊडस्पीकर/भोंग्यांसाठी परवानगी घेतली नसून, ध्वनी मापक यंत्रही बसवले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दिवसातून ४-५ वेळा मोठ्या प्रमाणात होणारा हा गोंगाट कायद्यात बसत नाही, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

सोमय्या यांनी काही पोलीस अधिकारी कारवाई करत नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. "हे बेकायदेशीर आहे हे माहीत असूनही अनेक पोलीस स्टेशनचे अधिकारी कारवाई करत नाहीत, याची गंभीर दखल घ्यावी लागेल," असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. या संदर्भात तात्काळ योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

  • Kirit Somaiya

  • Loudspeaker Controversy

  • Faraaskhana Police Station

  • Pune Noise Pollution

#KiritSomaiya #Loudspeaker #NoisePollution #PunePolice #BJP #MaharashtraPolitics #FaraaskhanaPolice

किरीट सोमय्या यांचे फरासखाना पोलिसांना पत्र; मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाईची मागणी किरीट सोमय्या यांचे फरासखाना पोलिसांना पत्र; मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाईची मागणी Reviewed by ANN news network on ८/०४/२०२५ १०:०६:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".