नवी मुंबईत ऑनलाईन साईटच्या माध्यमातून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा क्राईम ब्रँचकडून पर्दाफाश

 


नवी मुंबई, (प्रतिनिधी): नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने ऑनलाईन साईटद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका मोठ्या वेश्याव्यवसायाच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.  या कारवाईत पोलिसांनी ५ पीडित महिला/मुलींची सुटका केली असून, या टोळीतील ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.  आरोपींनी गुगलवर मोबाईल नंबर सर्च करून व्हॉट्सॲप चॅटिंगच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करून नवी मुंबईतील नेरुळ, वाशी, तुर्भे परिसरातील लॉजमध्ये देहविक्रीचा व्यवसाय चालवला होता.  

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला सूचना देण्यात आल्या होत्या.  गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑनलाईन साईटद्वारे हा व्यवसाय चालत होता.  पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून आरोपी राजेशकुमार मुन्ना यादव (ऑनलाईन साईट चालवणारा) याच्याशी संपर्क साधला.  त्याने ग्राहकाला हॉटेल गोल्डन ओक, तुर्भे येथे रूम बुक करण्यास सांगितले आणि व्हॉट्सॲपवर महिलांचे फोटो पाठवले.  

 बनावट ग्राहकाच्या माहितीनुसार, पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला आणि एका महिलेला ताब्यात घेतले.  चौकशीत राजेशकुमार यादव याचे नाव समोर आले.  पोलिसांनी त्याचा मोबाईल नंबर तांत्रिक तपासणी करून त्याला जुहूगाव, वाशी येथून अटक केली.  आणखी चौकशीत इतर महिलांना नेरुळमधील एका निवासस्थानी ठेवल्याचे निष्पन्न झाले.  त्या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी आणखी दोन महिलांची सुटका केली.  या कारवाईमुळे मानवी वाहतुकीच्या या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड झाला आहे.  


  • Online Prostitution
  • Police Raid
  • Human Trafficking
  • Navi Mumbai Crime

 #NaviMumbaiPolice #ProstitutionRacket #HumanTrafficking #PoliceRaid #CrimeNews #NaviMumbai #Justice

 


नवी मुंबईत ऑनलाईन साईटच्या माध्यमातून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा क्राईम ब्रँचकडून पर्दाफाश नवी मुंबईत ऑनलाईन साईटच्या माध्यमातून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा क्राईम ब्रँचकडून पर्दाफाश Reviewed by ANN news network on ८/०१/२०२५ ०१:४३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".