लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिवादन

 


रत्नागिरी, १ ऑगस्ट २०२५ : स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी येथील त्यांच्या जन्मस्थळी असलेल्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच, या ठिकाणी असलेल्या ध्वजस्तंभावर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तिरंग्याचे ध्वजारोहणही करण्यात आले.

'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' असा निर्धार ब्रिटिश राजवटीला ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यसंग्रामाला मोठे बळ दिले. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदराने अभिवादन केले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीत गायले.

यावेळी, जन्मस्थळाच्या आतील भागात लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच, त्यांच्या अर्धपुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर उपस्थितांनी लोकमान्यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शन आणि वस्तूंची पाहणी केली.

या प्रसंगी प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनीही अभिवादन केले.


Lokmanya Tilak, Bal Gangadhar Tilak, Punya Tithi, Ratnagiri, District Collector, Flag Hoisting, Swaraj, Freedom Fighter, Tribute, Maharashtra

 #LokmanyaTilak #PunyaTithi #Ratnagiri #Maharashtra #FreedomFighter #IndianHistory #Swaraj #FlagHoisting

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिवादन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिवादन Reviewed by ANN news network on ८/०१/२०२५ ०१:१३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".