पुणे, ३१ जुलै २०२५: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (NIA) न्यायालयाने आज (गुरुवार, ३१ जुलै) सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्यामुळे अखेर ‘हिंदू आतंकवाद’ वा ‘भगवा दहशतवाद’ या नावाने रचलेले घृणास्पद काँग्रेसचे षड्यंत्र उघडे पडले आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी म्हटले आहे. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर त्यांनी ही मागणी केली.
हिंदूंना बदनाम करण्याचा कट
श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले की, केवळ हिंदू असल्यामुळे राष्ट्रनिष्ठ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित, मेजर उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी आणि अजय राहिरकर यांच्यासारख्या अनेक राष्ट्रप्रेमी व्यक्तींना अकारण वर्षानुवर्षे तुरुंगात डांबण्यात आले. त्यांचा अमानुष मानसिक आणि शारीरिक छळ केला गेला. हा केवळ त्यांच्या विरोधातील अन्याय नसून, संपूर्ण हिंदू समाजाला बदनाम करण्याचा एक मोठा विखारी कट होता. त्यामुळे आता ही केस केवळ बंद करून चालणार नाही, तर हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे षड्यंत्र रचणाऱ्यांवर कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
मालेगाव प्रकरणात ‘हिंदू आतंकवाद’ या शब्दाचा वापर करणारे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नंतर ती चूक असल्याचे जाहीरपणे कबूल केले; पण त्यांनी तो शब्द कोणाच्या सांगण्यावरून वापरला? हिंदूंना बदनाम करण्यामागे कोणाचे षड्यंत्र होते? त्या सूत्रधारांवरही कारवाई झाली पाहिजे, असे शिंदे यांनी म्हटले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मध्यंतरी ‘या देशात हिंदू दहशतवाद ही पाकिस्तानातील लष्करी इस्लामी आतंकवादापेक्षा मोठी समस्या आहे,’ असे विधान अमेरिकेच्या राजदूतासमोर केल्याचे विकिलिक्स केबलने उघड केले होते. हिंदू समाजावर दहशतवादाचा खोटा शिक्का मारणारे, राष्ट्रनिष्ठ व्यक्तींना यात अडकवणारे आणि तपासाच्या नावाखाली अन्याय करणारे सगळे दोषी शोधून त्यांना कठोर शिक्षा देणे हाच खरा न्याय आहे, असेही श्री. रमेश शिंदे यांनी ठामपणे सांगितले.
‘सत्याचा विजय’; मात्र षड्यंत्रकारी शक्तींना शिक्षा झाल्यावरच संपूर्ण न्याय मिळेल ! – सनातन संस्थेची भूमिका
वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात NIA विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी आदी सर्व हिंदुत्वनिष्ठांना निर्दोष मुक्त केले, अखेर न्यायदेवतेच्या मंदिरात पुन्हा एकदा ‘सत्याचा विजय’ झाला. धर्मनिष्ठेचा विजय झाला. हा निर्णय हिंदु समाजासाठी ऐतिहासिक आहे. सनातन संस्था या सर्व निर्दाेष मुक्त झालेल्या राष्ट्रनिष्ठांचे मन:पूर्वक अभिनंदन करते. या निर्णयाने केवळ अन्याय दूर झाला नाही, तर ‘हिंदु दहशतवाद’ प्रचलित करण्याचे षड्यंत्रही खोटे ठरले आहे. आज हिंदुत्वनिष्ठांची निर्दाेष मुक्तता झाली आहे; परंतु जोवर हिंदूंना गोवणार्या, खोटे पुरावे सादर करणार्या आणि साध्वीजींसह सर्वांवर कारागृहात अनन्वित अत्याचार करणार्या षड्यंत्रकारी शक्तींना शिक्षा होत नाही, तोवर संपूर्ण न्याय मिळाला, असे म्हणता येणार नाही. या सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाच्या निकालानंतर केली आहे.
Malegaon Blast Verdict, Hindu Terrorism, NIA Court, Congress Conspiracy, Ramesh Shinde, Hindu Janajagruti Samiti, Sadhvi Pragya Singh Thakur, Colonel Purohit, Justice, Rahul Gandhi
#MalegaonVerdict #HinduTerrorism #NIACourt #ConspiracyExposed #JusticeForHindus #RameshShinde #HinduJanajagrutiSamiti #CongressPolitics
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा