वाहन चोरांच्या मुसक्या आवळल्या; ३ आरोपी व २ अल्पवयीन ताब्यात

 


११ दुचाकींसह १२.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुणे, २८ जुलै: पुणे शहर पोलिसांच्या हडपसर पोलीस ठाण्याने वाहन चोरीच्या गुन्ह्यात तीन आरोपी आणि दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी ११ महागड्या दुचाकींसह एकूण १२ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामुळे हडपसर पोलीस स्टेशनसह मुंढवा, बंडगार्डन, विमाननगर, विश्रामबाग आणि देहुरोड पोलीस स्टेशनमधील एकूण ११ गुन्हे उघडकीस आले आहेत.

सविस्तर बातमी

वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पुणे शहर पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, डॉ. राजकुमार शिंदे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या. या सूचनांनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी तपास पथकाची बैठक घेऊन वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्याचे नियोजन केले.

हडपसर तपास पथकाने २० जुलै २०२५ ते २७ जुलै २०२५ या कालावधीत तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत, अमन उर्फ परश्या भोला तिवारी (वय १९, रा. हडपसर), मोहम्मद अशरफअली ईम्तीयाजअली अजमेरी (वय २०, रा. हडपसर) आणि विनीत विनोद वाघमारे (वय १९, रा. हडपसर) या तीन आरोपींना आणि दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले.

या आरोपींकडून पोलिसांनी ११ दुचाकी जप्त केल्या आहेत, ज्यात २ बुलेट, २ ड्युक, १ यामाहा एफझेड, ४ स्प्लेंडर आणि २ अॅक्टिवा यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या या सर्व दुचाकींची किंमत १२ लाख ३० हजार रुपये आहे.

उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमध्ये हडपसर पोलीस स्टेशनचे ५ गुन्हे (गु.र.नं. ६६५/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२), गु.र.नं. ४६१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२)), मुंढवा पोलीस स्टेशनचे २, बंडगार्डन पोलीस स्टेशनचा १, विमाननगर पोलीस स्टेशनचा १, विश्रामबाग पोलीस स्टेशनचा १ आणि देहूरोड पोलीस स्टेशनचा १ असे एकूण ११ गुन्हे आहेत.


Pune Police, Vehicle Theft, Hadapsar, Arrest, Two-Wheeler Recovery, Crime News

 #PunePolice #VehicleTheft #Hadapsar #CrimeNews #MaharashtraPolice #BikeRecovery

वाहन चोरांच्या मुसक्या आवळल्या; ३ आरोपी व २ अल्पवयीन ताब्यात वाहन चोरांच्या मुसक्या आवळल्या; ३ आरोपी व २ अल्पवयीन ताब्यात Reviewed by ANN news network on ७/२८/२०२५ ११:१८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".