प्रमुख उपस्थिती आणि नेत्यांची मते
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार तानाजी मुटकुळे, भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार संजय केनेकर, आमदार विक्रांत पाटील, माधवी नाईक, मराठवाडा विभागीय संघटन मंत्री संजय कोडगे, अमर राजुरकर, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, परभणी महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, सुरेश वरपुडकर हे सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकसित भारत आणि महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वरपुडकर यांच्या दांडग्या अनुभवामुळे परभणी जिल्ह्यात भाजप संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचा सन्मान राखला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, सहकार क्षेत्रातील कार्य आणि समाजकार्यामुळे परभणी जिल्ह्याच्या राजकारणात चार दशकांपासून ठसा उमटवणाऱ्या वरपुडकर यांच्या भाजप प्रवेशाने पक्ष संघटनेला बळ मिळेल.
सुरेश वरपुडकर यांची प्रतिक्रिया
भाजपच्या विकासनीतीला साथ देण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सुरेश वरपुडकर यांनी सांगितले. सर्वांच्या साथीने भाजपची विचारधारा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून पक्षवाढीस हातभार लावण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी केला.
इतर प्रमुख प्रवेशकर्ते
सुरेश वरपुडकर यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये परभणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समशेर वरपुडकर, जिल्हा परिषद माजी सभापती धोंडीराम चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम वाघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रेरणा वरपुडकर, माजी समाजकल्याण सभापती द्वारकाबाई कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अजय चव्हाण, जिल्हा परिषद माजी सदस्य तुळशीराम सामाले, पंचायत समितीचे माजी उपसभापती रामेश्वर कटिंग, पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर लाड, दिलीपराव साबळे आदी प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
Suresh Warpudkar, BJP Entry, Congress Leader, Parbhani Politics, Maharashtra BJP, Ravindra Chavan, Chandrashekhar Bawankule, Political Shift, Local Leaders, Maharashtra
#SureshWarpudkar #BJP #Congress #Parbhani #MaharashtraPolitics #RavindraChavan #ChandrashekharBawankule #PoliticalNews #Maharashtra #PartySwitch

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: