उरण, दि. ६ जुलै २०२५ : लायनेस्टिक वर्ष २०२५-२०२६ साठी लायन्स क्लब ऑफ उरणच्या अध्यक्षपदाचा शपथविधी सोहळा दि. ५ जुलै २०२५ रोजी राम रतन शामियाना, कामठा रोड, उरण येथे प्रचंड उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यात प्रमुख पाहुणे एम.जे.एफ. लायन खेमंत टेलर यांनी अध्यक्ष लायन प्रा. डॉ. साहेबराव ओहोळ यांना शपथ दिली. त्यांच्यासोबतच सचिवपदी लायन संध्याराणी ओहोळ, खजिनदारपदी लायन डॉ. अमोल गिरी आणि प्रथम उपाध्यक्षपदी लायन संदीप गायकवाड यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
यावेळी दुसरे पाहुणे पी.एम.जे.एफ. लायन अनुप थारवाणी यांच्या हस्ते पाच नवीन सभासदांचा लायन्स क्लब उरणमध्ये प्रवेश सोहळा पार पडला. सदर कार्यक्रमाला विभाग चेअरमन लायन दीपक पाटील, झोन चेअरमन लायन अंशू पॉल मॅडम उपस्थित होत्या. तसेच, जिल्हा कार्यकारिणीमधील लायन सुयोग पेंडसे, लायन संजय गोडसे, लायन मिलिंद पाटील, लायन्स क्लब उरणचे चार्टर मेंबर लायन चंद्रकांत ठक्कर, बी.ओ.डी. सदस्य लायन सदानंद गायकवाड, लायन संजीव अग्रवाल, लायन डॉ. प्रीती गाडे, लायन डॉ. संतोष गाडे, लायन प्रकाश नाईक, लायन नरेंद्र ठाकूर, लायन निलिमा नारखेडे, लायन ज्ञानेश्वर कोठावदे व इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Lions Club of Uran, Oath Ceremony, New President, Sahabrao Ohol, Social Service, Club Leadership, Uran
#LionsClub #Uran #OathCeremony #SocialService #CommunityLeadership #NewBeginnings #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: