पुणे, दि. २६
जुलै २०२५
दिनांक
२६ जुलै २०२५
रोजी अंमली पदार्थ
विरोधी पथक १
गुन्हे शाखा पुणे
शहर येथील पोलीस
अधिकारी व अंमलदार
पुणे आयुक्तालयाच्या हद्दीत
गस्त घालत असताना,
खराडी पुणे येथील
स्वामी समर्थ प्लाझा बिल्डींग
समोर, थिटे वस्ती,
काळुबाई नगर येथील
सार्वजनिक रस्त्यावर हर्षवर्धन राहुल
धुमाळ हा नंबर
प्लेट नसलेल्या के.टी.एम.
मोटार
सायकलवरून चुकीच्या दिशेने वेगाने
येत असल्याचे दिसले.
सखोल झडती घेतली असता, हर्षवर्धन राहुल धुमाळ, जो दुर्गा माता मंदिर जवळ, एकनाथ पठारे वस्ती, चंदननगर खराडी पुणे येथे राहतो, त्याच्या ताब्यातून २३ ग्रॅम १८ मिलीग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, ज्याची किंमत ४ लाख ६३ हजार ६०० रुपये आहे, तसेच १ लाख रुपये किमतीची एक मोटार सायकल, ६० हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोन, २० पारदर्शक प्लास्टिकच्या छोट्या रिकाम्या पिशव्या आणि एक काळ्या रंगाचे पॉकेट पाऊच असा एकूण ६ लाख २३ हजार ६०० रुपयांचा ऐवज मिळून आला.
आरोपीविरुद्ध खराडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १५३/२०२५ एन.डी.पी.एस. ऍक्ट कलम ८ (क), २२ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर येथील निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहा. निरीक्षक अनिल सुरवसे, उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, अंमलदार संदीप शिर्के, दयानंद तेलंगे, नागनाथ राख, सचिन माळवे, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, तसेच खराडी पोलीस स्टेशन येथील उप निरीक्षक राहुल कोळपे, अंमलदार नाणेकर यांनी यशस्वीपणे पार पाडली.
Crime News, Drug Bust, Pune Police, Anti-Narcotics Cell
#PunePolice #DrugBust #Mephedrone #Kharadi #CrimeNews #AntiNarcotics

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: