भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनचा २५१ वा सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी
गुरुकुलच्या युवा गायिका अनुष्का साने, रसिका पैठणकर आणि नुपूर देसाई यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. गीत इनामदार (तबला), आकाश नाईक (हार्मोनियम), स्वप्नील सूर्यवंशी (पखवाज) आणि आनंद टाकळकर (तालवाद्य) यांनी गायिकांना साथसंगत केली, तर कार्यक्रमाचे भावपूर्ण निरूपण ह. भ. प. मानसी बडवे यांनी केले.
'जय जय राम, कृष्ण हरी' या गजराने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अनुष्का साने यांनी 'अवघे गर्जे पंढरपूर, पाहावा नयनी', 'छंद लागला' हे अभंग सादर केले. रसिका पैठणकर यांनी 'एकच रे मागणे', 'श्रीरंगा', 'जोहार' हे अभंग सादर केले. नुपूर देसाई यांनी 'रूप पाहता लोचनी', 'अवघाचि संसार', 'परब्रम्हम निष्काम' हे अभंग सादर केले. 'अगा वैकुंठच्या राया' या अभंगाने कार्यक्रमाची सांगता झाली. सांस्कृतिक प्रसाराच्या उपक्रमांतर्गत भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सादर होणारा हा २५१ वा कार्यक्रम ठरला. कार्यक्रमास पुणेकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रवेश विनामूल्य असल्याने पुणेकर रसिक आणि भाविकांनी या भक्तिपर्वाचा लाभ घेतला.
भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी ज्ञानेश्वरीची प्रत देऊन कलाकारांचा सत्कार केला. संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानचे गोविंद बेडेकर, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे माजी प्रमुख अभियंता अविनाश शेटजी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Local News, Culture, Music, Devotional Event, Pune
#Abhangarang #PuneEvents #AbhangGayan #BhaktiSangeet #AashadhiEkadashi #IndianCulture #BharatiyaVidyaBhavan

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: