उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा; रोजगार मेळाव्यात ४२६ पदवीधरांना 'ऑन दी स्पॉट ऑफर लेटर'

 


पिंपरी, दि. २४ जुलै २०२५: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यातील प्रमुख आकर्षण ठरलेल्या रोजगार व मार्गदर्शन मेळाव्यात एकाच दिवसात तब्बल ४२६ पदवीधरांना 'ऑन दी स्पॉट ऑफर लेटर' मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला.

रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्पर्धेच्या युगात युवक-पदवीधरांना नोकरीच्या संधींसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या रोजगार व मार्गदर्शन मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे ३५०० बेरोजगार युवकांनी या महोत्सवात सहभाग घेतला. २ हजार ८४२ हून अधिक पदवीधर युवकांनी ऑनलाईन मुलाखतींसाठी नोंदणी केली, तर १५८८ युवकांनी प्रत्यक्ष मेळाव्यात विविध कंपन्यांकडे मुलाखती दिल्या. त्याद्वारे ४२६ पदवीधरांना तात्काळ नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली. बहुतांश उमेदवारांना 'ऑफर लेटर' उपलब्ध झाले आहेत. कंपनी व्यवस्थापनांकडून ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आगामी काळात होणार आहेत. काही उमेदवारांना दोन-दोन ऑफर मिळाल्याचेही दिसून आले.

या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, माेजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

विविध सामाजिक उपक्रम

अजिते पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले:

  • वृक्षारोपण: २२ जुलै रोजी बी.डी. किल्लेदार उद्यान, स्वर्गीय राजेश बहल उद्यान, PWD मैदान (चिंचवड विधानसभा), काळेवाडी, पिंपळेनिलख, इद्रायणीनगर भोसरी सी सेक्टर, इंदीरानगर आणि पिंपळेसौदागर पूल येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात एकूण ६५ देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले.

  • हॅप्पी स्ट्रीट - झुंबा कार्यक्रम: १३ जुलै रोजी संत तुकारामनगर, पिंपरी येथे बालक, युवक, युवती, तरुण आणि जेष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झुंबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

  • रक्तदान शिबिरे: चिंचवड मतदार संघात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

    • पिंपळे सौदागर येथील शंभो महादेव मंदिरात नाना काटे सोशल फाउंडेशन व उमेश काटे युथ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने १५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

    • नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात शहराध्यक्ष योगेश बहल आणि माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित शिबिरात ७२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

    • रहाटणी येथे युवानेते सागर कोकणे यांच्यावतीने आयोजित शिबिरात ४५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

    • थेरगाव परिसरात ग्रामदैवत बापूजी बुवा मंदिरात आयोजित शिबिरात २१५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

  • दंत तपासणी शिबीर: सौ. विजया काटे यांच्यामार्फत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले, ज्यात ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनीही तपासणी करून घेतली.

  • चित्रकला स्पर्धा व गुणवंतांचा सत्कार: प्रेरणा माध्यमिक विद्यालय, वाल्हेकरवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच, थेरगाव परिसरातील इयत्ता १०वी व १२वी मधील गुणवंतांचा सत्कार समारंभ आणि खाजगी व प्राथमिक, माध्यमिक शाळेमध्ये संयुक्त चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

  • शालेय वस्तूंचे वाटप: लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्राथमिक शाळा, संत तुकारामनगर येथे अजित  पवार आणि योगेश बहल यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे यांनी शालेय साहित्य (वही वाटप) तसेच शिक्षक सेवकांचा सन्मान केला.

  • वाहतूक विभागाचे उपक्रम: वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे यांच्या वाहतूक विभागाच्यावतीने मोफत पीयुसी, महिलांकरिता कार ट्रेनिंग विथ लायसन्स, टू व्हीलर लायसन्स अल्प दरात उपलब्ध असे कार्यक्रम घेण्यात आले, ज्यात अनेक महिलांनी सहभाग नोंदविला.

कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धा

कॅरम स्पर्धा (१९ ते २० जुलै २०२५): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड आयोजित  अजित  पवार व   योगेश बहल यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथम जिल्हास्तरीय मानांकन कॅरम स्पर्धेत एकूण १३६ खेळाडूंनी सहभाग घेतला.

  • निकाल: प्रथम- रहीम खान, द्वितीय- निकुल काकडे, तृतीय- अभिजित त्रिपणकर, चतुर्थ- योगेश परदेशी, पाचवा- अनिल मुंढे, सहावा- गणेश तावरे, सातवा- अनुराग दुबळे, आठवा- हरून शेख.

बुद्धिबळ स्पर्धा: स्व. राजेश बहल स्पोर्ट्स व सोशल फाउंडेशन व योगेश बहल मित्रपरिवार यांनी पिंपरी चिंचवड महानगर चेस असोसिएशनच्या सहकार्याने भोसरी येथे दुसरी फिशर रँडम (चेस ९६०) व वयोगटातील पारंपरिक बुद्धिबळ स्पर्धा घेतली. पुणे जिल्ह्यातील एकूण ३१० खेळाडूंचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

  • खुल्या गटात विजेतेपद: चिंचवडचा आदित्य जोशी (विजेता) आणि पुणे शहराचा अविरत चौहान (उपविजेता).

  • वयोगटानुसार विजेते: १५ वर्षांखालील सई पाटील, १३ वर्षांखालील ओम रामगुडे, ११ वर्षांखालील श्रीयांश सुहाने, ९ वर्षांखालील विहान शहा, ७ वर्षांखालील अनिरुद्ध नगरकर यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.

  • सर्व गटात मिळून विजेत्या खेळाडूंना एकूण रु. ८०,००० रोख, ४३ सन्मानचिन्हे व ९९ पदके प्रदान करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्यावतीने आजी-माजी आमदार, महापौर, नगरसेवक, नगरसेविका, सेल अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आयोजित केलेल्या या विविध कार्यक्रमांमुळे अजित दादांचा वाढदिवस स्वयंपूर्ण उत्साहात साजरा करण्यात आला.


 Ajit Pawar, Birthday Celebration, Pimpri Chinchwad, NCP, Job Fair, Employment, Blood Donation, Tree Plantation, Carrom, Chess, Social Initiatives, Maharashtra Politics

 #AjitPawar #Birthday #PimpriChinchwad #NCP #JobFair #BloodDonation #TreePlantation #Chess #Carrom #MaharashtraPolitics

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा; रोजगार मेळाव्यात ४२६ पदवीधरांना 'ऑन दी स्पॉट ऑफर लेटर' उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा; रोजगार मेळाव्यात ४२६ पदवीधरांना 'ऑन दी स्पॉट ऑफर लेटर' Reviewed by ANN news network on ७/२४/२०२५ ०५:५५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".