म्हाडाच्या संकेतस्थळावर १५ कोटी अधिकृत दस्तऐवज नागरिकांसाठी उपलब्ध
पुणे: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. म्हाडा अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रादेशिक मंडळांची कार्यालयीन दस्तऐवज पाहण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, यासाठी माहितीच्या अधिकारांतर्गत (RTI) माहितीच्या स्वयंप्रकटीकरणाद्वारे म्हाडाच्या
नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून, 'म्हाडा' या निमशासकीय संस्थेने सुलभ आणि सुरक्षितपणे माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे एक ऐतिहासिक आणि धाडसी पाऊल टाकले आहे. या माध्यमातून म्हाडाच्या कार्यालयीन प्रक्रियेतील पारदर्शकता वाढणार असून, नागरिकांचा कार्यालयात येण्या-जाण्याचा त्रास कमी होणार आहे.
संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, सोडतीदरम्यान नागरिकांकडून घेतली जाणारी कागदपत्रे आणि माहिती याबाबत पूर्ण गुप्तता बाळगण्यात आली आहे. यात कोणत्याही प्रकारे मानवी हस्तक्षेप होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. या ऑनलाइन सुविधेमुळे नागरिकांना आवश्यक माहिती मिळवणे अधिक सोपे होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: