गोदरेजच्या प्रगतीतील हा एक महत्त्वाचा टप्पा असून, तो एरोस्पेस उत्पादन क्षमता वाढवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला बळकटी देतो. तसेच, जागतिक विमान इंजिन OEM (Original Equipment Manufacturer) चा प्रमुख पुरवठादार बनण्याच्या गोदरेजच्या दृष्टिकोनाशी हा करार सुसंगत आहे. या करारामुळे तंत्रज्ञान आणि उत्पादन अशा दोन्ही बाबतीत, विमान इंजिनाच्या उपयोगासंदर्भात कंपनीच्या ऑफरिंगमध्ये लक्षणीय वाढ होईल.
गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा भाग असलेल्या एरोस्पेस व्यवसायाचे प्रमुख मानेक बेहरामकामदिन म्हणाले, "दर्जेदार उत्पादनात गोदरेज अनेक दशकांपासून आघाडीवर आहे. या माध्यमातून ते भारताची एरोस्पेस महत्त्वाकांक्षा तसेच महत्त्वाच्या तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण होण्याच्या भारताच्या क्षमतेला हातभार लावत आहे. प्रॅट अँड व्हिटनीसोबतचा हा करार केवळ व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण टप्पा नाही, तर तो क्लिष्ट एरोस्पेस उत्पादनातील भारताच्या वाढत्या क्षमतांचा पुरावा आहे." ते पुढे म्हणाले, "प्रगत पायाभूत सुविधा, सखोल ज्ञान आणि जागतिक दर्जाच्या मानकांप्रती वचनबद्धतेचा फायदा घेऊन, भारतातील विमान वाहतूक उत्पादनाचे भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचा आम्हाला अभिमान आहे. हे संबंध मजबूत करण्यास आणि जागतिक एरोस्पेस पुरवठा साखळीत आमचे स्थान भक्कम करण्यास आम्ही उत्सुक आहोत."
या करारासह, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने प्रिसिजन एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपला विस्तार सुरूच ठेवला आहे, ज्यामुळे जागतिक OEM ला एक विश्वासार्ह पुरवठादार म्हणून त्याचे स्थान अधिक भक्कम होत आहे. गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपची भारतात जवळपास ३५,००० चौरस मीटर एरोस्पेस उत्पादन क्षमता आहे, तर आणखी ४८,५०० चौरस मीटर विकासाधीन आहे. जागतिक स्तरावर भारताच्या उत्पादन क्षमता वाढवण्यासोबतच त्या अधिक सक्षम करण्याच्या कंपनीच्या दृष्टिकोनाशी हे जोडलेले आहे.
Godrej Aerospace, Pratt & Whitney, Aerospace Manufacturing, Aviation Engines, India Manufacturing, OEM Supplier, Defence & Aerospace
#GodrejAerospace #PrattAndWhitney #Aerospace #Manufacturing #MakeInIndia #Aviation #DefenceIndustry #Godrej #MumbaiNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: