छत्रपती संभाजीनगर: वैजापूर तालुक्यातील नारळा गावचे कृषी सहाय्यक जगदीश गेनुदास गवळी (वय ४१ वर्ष) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ५,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई, २३ जुलै २०२५ रोजी करण्यात आली. तक्रारदाराच्या शेततळ्याच्या मंजूर बिलाचे हप्ते खात्यावर जमा करण्यासाठी गवळी यांनी ही लाच मागितली होती.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराचे नारळा
शिवारात गट क्रमांक २०७
मध्ये शेतजमीन असून,
त्यावर जलयुक्त शिवार
योजनेअंतर्गत शेततळे मंजूर झाले
होते. या तळ्याच्या मोजमापानुसार त्यांना एकूण
२,२५,०००
रुपये मंजूर झाले
होते. हे मंजूर
बिल तक्रारदाराच्या खात्यावर जमा
करण्यासाठी आरोपी लोकसेवक जगदीश
गवळी यांनी यापूर्वीही तक्रारदाराकडून ३०,००० रुपये घेतले
होते.
मंजूर
झालेल्या बिलाचे हप्ते खात्यावर कधी
जमा होतील, याची
माहिती विचारण्यासाठी तक्रारदार गवळी
यांच्याकडे गेले असता, त्यांनी पुन्हा
५,००० रुपयांची लाच
मागितली. तक्रारदाराला लाच
देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २३
जुलै २०२५ रोजी
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे
संपर्क साधून तक्रार
दाखल केली.
तक्रारीच्या अनुषंगाने, २३ जुलै २०२५ रोजी सापळा रचण्यात आला. तक्रारदार आणि पंचांसमक्ष आरोपी गवळी यांनी ५,००० रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. जगदीश गेनुदास गवळी यांच्याविरुद्ध वैजापूर पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम-१९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही
कारवाई माधुरी
कांगणे, अधीक्षक, आणि
सुरेश नाईकनवरे, प्रभारी अपर अधीक्षक तथा उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक धर्मराज बांगर
आणि वाल्मीक कोरे यांनी केली.
त्यांना हवालदार राजेंद्र जोशी, अंमलदार युवराज
हिवाळे, आणि चांगदेव बागुल
यांनी मदत केली.
Crime, Corruption, Police Action
#ACB #ChhatrapatiSambhajinagar
#Bribery #Corruption #AgriculturalAssistant

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: