करमाळा येथील महिला बचत गटाची २१ टन केळी इराणला निर्यात

 

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील 'साऊली शेतकरी महिला उत्पादक कंपनी'ने आपल्या २१ टन केळीची इराणला यशस्वी निर्यात केली आहे. 'उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान', 'टेकनोसर्व' आणि 'केडी एक्सपोर्ट' यांच्या संयुक्त विद्यमाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात आला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली 'उमेद अभियान' अंतर्गत स्थापन झालेल्या या महिला उत्पादक कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारात पदार्पण केले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपन्या आणि स्वयंसहाय्यता बचत गट यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा आणि ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान समृद्ध व्हावे, यासाठी 'उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान' कार्यरत आहे. बचत गटाच्या महिलांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या 'महिला शेतकरी उत्पादक कंपनी'मार्फत शेतमालाची होणारी ही निर्यात निश्चितच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.

यावेळी 'उमेद'चे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, संतोष डोंबे, 'टेकनोसर्व्ह'चे मृत्युंजय, चंद्रविर, 'केडी एक्सपोर्ट'चे किरण डोके, अवधूत देशमुख, सुषमा बिचुकले, तसेच 'साऊली शेतकरी उत्पादक कंपनी'च्या संचालक प्राजक्ता पोरे, दिपाली पंढरे, सुवर्णा खबाले, मुक्ता सोमासे, तबस्सुम शेख, मनिषा बोराडे आदी उपस्थित होत्या.


Solapur, Karmala, Women Self-Help Group, Banana Export, Iran, Umed Maharashtra State Rural Livelihoods Mission, Rural Empowerment, Agricultural Export

 #Solapur #Karmala #BananaExport #Iran #WomenEmpowerment #RuralLivelihoods #UmedAbhiyan #AgriculturalExports #Maharashtra

करमाळा येथील महिला बचत गटाची २१ टन केळी इराणला निर्यात करमाळा येथील महिला बचत गटाची २१ टन केळी इराणला निर्यात Reviewed by ANN news network on ७/२८/२०२५ १०:२७:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".