तोतया आरटीआय कार्यकर्त्याला खंडणी घेताना अटक

 



ठाणे शहर: कल्याण परिसरातील हॉटेल व्यवसायिकांना खोट्या तक्रारींची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या नितीन शांताराम घोले (वय ४९ वर्ष) या तोतया आर.टी.आय. कार्यकर्त्याला ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.  घोले याला २१ जुलै २०२५ रोजी संतोष हॉटेल, कल्याण पश्चिम येथे ५०,०००/- रुपयांची खंडणी स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.  

देवराज तिमप्पा पुजारी यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जानुसार, नितीन घोले हा स्वतःला आर.टी.आय.  कार्यकर्ता भासवून, पोलीस आणि इतर शासकीय अधिकारी त्याला घाबरतात असे सांगून, पैसे दिल्यास खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देत खंडणी मागत असल्याचे समोर आले.  

या तक्रारीच्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकाने सापळा रचला आणि रात्री ११.५५ वाजता त्याला ताब्यात घेतले. आरोपी नितीन घोले याच्याविरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.  नंबर ८४५/२०२५, बीएनएस कायदा कलम ३०८ (), ३०८(), ३०८(), () अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

गुन्ह्याचा पुढील तपास खंडणी विरोधी पथक, ठाणे करीत आहे.  आरोपीने अशाप्रकारे इतरही हॉटेल व्यवसायिकांकडून खंडणी घेतल्याची शक्यता असून, तशी मागणी झाली असल्यास संबंधितांनी नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.  

ही कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ  निरीक्षक शैलेश साळवी, सहायक निरीक्षक कृष्णा गोरे, हवालदार कानडे, शिंदे,  हिवरे, नाईक हासे, शिपाई ढाकणे यांनी केली आहे.  

Crime, Extortion, Police Action 

 #ThanePolice #Extortion #RTIAactivistArrested #CrimeNews #Kalyan


तोतया आरटीआय कार्यकर्त्याला खंडणी घेताना अटक तोतया आरटीआय कार्यकर्त्याला खंडणी घेताना अटक Reviewed by ANN news network on ७/२५/२०२५ ०२:०१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".