दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नाशिकमधून जेरबंद!

 


पोलिसांवर हल्ला करणारा सराईत गुन्हेगार अखेर गजाआड

पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ने दरोड्याच्या एका गंभीर गुन्ह्यातील फरार असलेल्या मुख्य आरोपी फिरोजखां शरीफखां दुल्लोत उर्फ मेवाती (वय ३४, रा. झंजाळा, पोस्ट- अंबई, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर) याला नाशिक येथून मोठ्या शिताफीने अटक केली आहे.  या आरोपीने ऑक्टोबर २०२४ मध्ये डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीत गस्तीवरील पोलीस अंमलदारावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता.   

 २२ ऑक्टोबर २०२४ रोजी डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीत प्रभात मार्शल पथकाचे पोलीस अंमलदार रात्रीची गस्त घालत असताना, सहा अनोळखी इसम धारदार हत्यारांसह दरोड्याच्या तयारीत होते.  पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी पोलीस अंमलदाराच्या हातावर धारदार हत्याराने वार केला.  स्वसंरक्षणार्थ पोलीस अंमलदाराने शासकीय पिस्तूलमधून दोन गोळ्या आरोपींच्या दिशेने फायर केल्या, ज्यात दोन आरोपी जखमी झाले होते.  मात्र, अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. या प्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये भा.न्या.सं. कलम ३१० (), १२१ (), १३२ सह भारतीय हत्यार कायदा कलम (२४) सह .पो.  कायदा ३०()(), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.  या गुन्ह्यातील एका आरोपीला यापूर्वीच गुन्हे शाखा आणि डेक्कन पोलिसांनी अटक केली होती, तर इतर पाच आरोपींना न्यायालयाने फरार घोषित केले होते.   

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असताना, दिनांक ०१ जुलै २०२५ रोजी गुन्हे शाखा, युनिट चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री.  वाहीद पठाण यांना गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस अंमलदारांवर हल्ला करणारा मुख्य फरार आरोपी फिरोजखां शरीफखां दुल्लोत उर्फ मेवाती हा नाशिक येथे येणार आहे. या माहितीच्या आधारे, वरिष्ठांच्या परवानगीने तात्काळ सहा.  पोलीस निरीक्षक राकेश कदम, पोलीस अंमलदार सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे आणि सचिन पवार यांचे पथक नाशिककडे रवाना करण्यात आले.  

या पथकाने स्थानिक भद्रकाली पोलीस स्टेशनच्या मदतीने बी.डी.  भालेकर मैदान, कान्हेरेवाडी, भद्रकाली, नाशिक येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.  अटक केलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत.  वरिष्ठांच्या परवानगीने पुढील कारवाईसाठी आरोपीला डेक्कन पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.  

ही कामगिरी युनिट गुन्हे शाखेचे  निरीक्षक  वाहीद पठाण, सहानिरीक्षक राकेश कदम, मदन कांबळे, तसेच  अंमलदार बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, सारंग दळे, कानिफनाथ कारखेले, प्रशांत कापुरे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, नितिन धाडगे, बाळासाहेब तनपुरे,  पानसरे, नेहा तापकीर, मांदळे, नरवडे यांनी  पार पाडली.  

 Crime, Police, Arrest, Pune, Nashik 

#PunePolice #CrimeNews #RobberyArrest #MaharashtraPolice #FirozkhannMewati #PoliceAction #NashikArrest

 


दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नाशिकमधून जेरबंद! दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नाशिकमधून जेरबंद! Reviewed by ANN news network on ७/०४/२०२५ ०१:३४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".