ठाणे, ०५ जुलै २०२५: ठाणे पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या तीन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ३७ लाख ३७ हजार ४०० रुपये किमतीचा ७४ किलो ५४८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
भिवंडीतील मोमीनबाग दर्गा रोड भागात अन्वर अन्सारी याच्या घराजवळ फैजल हा गांजाच्या तस्करीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून फैजल याच्यासह अब्दुल अन्सारी आणि अन्वर अन्सारी या तिघांना मोठ्या शिताफीने अटक केली.
पोलिसांनी फैजल आणि अब्दुल यांच्या अंगझडती घेतली. तसेच, अन्वर अन्सारीच्या भिवंडीतील मोमीनबाग दर्गा रोड येथील घराच्या पडवीचीही झडती घेतली असता, तेथे एकूण ७४ किलो ५४८ ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला.
याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही टोळी हा गांजा कोणाकडून आणत होती? त्यांचे आणखी कोण कोण साथीदार आहेत? या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.
Crime, Narcotics, Drug Trafficking, Thane Police, Bhiwandi, Arrest, Ganja
#ThanePolice #DrugBust #GanjaSeizure #Bhiwandi #CrimeNews #Narcotics #Arrest

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: