पिंपरी, ३ जुलै २०२५: आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आज पिंपळे निलख येथील मुख्य बसस्थानकावर विद्यार्थ्यांसाठी एका प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच विविध क्षेत्रात उत्तम यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्री. अजित फाटके पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते हा उपक्रम संपन्न झाला. यावेळी शहराध्यक्ष रविराज काळे यांनी कै. नारायण शंकर घोडके यांच्या स्मरणार्थ १०वी व १२वी उत्तीर्ण मुलांसाठी महात्मा जोतिबा फुले शिष्यवृत्ती (७,०००/- रु.), कै. मुक्ताबाई रामचंद्र बालवडकर यांच्या स्मरणार्थ १०वी व १२वी उत्तीर्ण मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (७,००००/- रु.), आणि पिंपरी चिंचवड शहरातील १०वी व १२वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आम आदमी पार्टी विशेष शिष्यवृत्ती (११,०००/- रु.) अशा शिष्यवृत्त्या जाहीर केल्या.
शहराध्यक्षांच्या कार्याचे कौतुक
यावेळी बोलताना श्री. अजित फाटके पाटील यांनी शहराध्यक्ष श्री. रविराज काळे आणि आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडच्या कार्याचे विशेष कौतुक केले. रविराज काळे यांनी पिंपळे निलख परिसरात राबवलेल्या नवनवीन उपक्रमांमुळे परिसराचा कायापालट झाला असून, आम्हाला त्यांचा अभिमान आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. रविराज काळे यांनी ज्या अंगणवाडी व शाळांमध्ये उपक्रम राबवले, त्या शाळांतील शिक्षक-शिक्षिकांनी मनोगत व्यक्त करत आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हे एक सकारात्मक पाऊल होते. आम आदमी पार्टीने गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित केले.
या उपक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष रविराज बबन काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमास पक्षाचे वैजनाथ शिरसाट, प्रकाश हगवणे, यल्लाप्पा वालदोर, पुणे शहर युवक शहराध्यक्ष अमित मस्के, दत्तात्रेय काळजे, चंद्रमणी जावळे, सुनील शिवशरण, शुभम यादव, अजय सिंग इत्यादी पदाधिकारी, तसेच पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
Aam Aadmi Party, Pimpri Chinchwad, Student Felicitation, School Supplies, Scholarship, Education Initiative, Community Program
#AAP #PimpriChinchwad #StudentWelfare #Education #Scholarship #CommunityService #PimpleNilakh #AamAadmiParty

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: