पर्वती पोलिसांनी नागरिकांचे २० हरवलेले मोबाईल परत केले

 


पुणे, दि.  २६ जुलै २०२५  : पर्वती पोलीस स्टेशनने गेल्या सहा महिन्यांत हरवलेले २० मोबाईल फोन परत मिळवून नागरिकांना सुपूर्द केले आहेत.  या मोबाईलची एकूण किंमत सुमारे लाख रुपये आहे.  पुणे शहर पोलीस दलाच्या या कामगिरीबद्दल नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.  

 पर्वती पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील सहा महिन्यांत बाजारपेठांमध्ये आणि इतर ठिकाणी मोबाईल हरवल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.  या तक्रारींची दखल घेत, वरिष्ठांकडून मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश प्राप्त झाले होते. या अनुषंगाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.  नंदकुमार गायकवाड आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांच्या देखरेखीखाली एक विशेष पथक नेमण्यात आले.  या पथकात पोलीस अंमलदार धायगुडे आणि खेडकर यांची नेमणूक करण्यात आली होती.  

 या पथकाने हरवलेल्या मोबाईलचे तसेच त्यामध्ये वापरण्यात आलेल्या नवीन नंबरचे तांत्रिक विश्लेषण केले.  त्यांनी प्रत्यक्ष संपर्क साधून कर्नाटक, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून एकूण २० मोबाईल हस्तगत केले. हे मोबाईल आज दिनांक २६ जुलै २०२५ रोजी  पोलीस उप-आयुक्त परिमंडळ , पुणे शहर यांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आले.  

Pune Police, Lost Mobiles, Parvati Police Station, Public Service 

#PunePolice #LostMobileFound #ParvatiPolice #CommunityService #GoodJobPolice


पर्वती पोलिसांनी नागरिकांचे २० हरवलेले मोबाईल परत केले पर्वती पोलिसांनी नागरिकांचे २० हरवलेले मोबाईल परत केले Reviewed by ANN news network on ७/२७/२०२५ ०२:४४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".