हॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांचा जल्लोष! 'नाफा २०२५' महोत्सवाचा दिमाखदार सोहळा 'द कॅलिफोर्निया थिएटर'मध्ये सुरू

 

सॅन होजे, दि. २५ जुलै २०२५ (प्रतिनिधी): 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे 'नाफा' परिवाराने जल्लोषात स्वागत केले आहे. काल, २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील निवासस्थानी सर्व कलाकारांचा जंगी सत्कार करण्यात आला. या पूर्व-सांस्कृतिक संध्येला कलाकारांच्या उपस्थितीने रंगत आली असून, उत्सवाची बहारदार सुरुवात झाली आहे.

'नाफा'ची स्थापना आणि उद्देश

उत्तर अमेरिकेत मराठी चित्रपट लोकप्रिय व्हावेत आणि समृद्ध मराठी संस्कृतीचे दर्शन संपूर्ण अमेरिकेतील प्रेक्षकांना घडावे, या हेतूने 'देऊळ' आणि 'भारतीय' या चित्रपटांची यशस्वी निर्मिती करणारे राष्ट्रीय सुवर्णकमळ पुरस्कार प्राप्त निर्माते यशस्वी उद्योजक अभिजीत घोलप यांनी मागील वर्षीनाफाची स्थापना केली. त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम आज एक मोठा सांस्कृतिक सोहळा ठरत आहे. अभिजीत घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी 'नाफा'चे सुमारे १००-१५० स्वयंसेवक गेले काही महिने अथक परिश्रम घेत आहेत.

आजपासून 'फिल्म अवॉर्ड नाईट'सह महोत्सवाला सुरुवात

आज, २५ जुलैपासून 'नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२५' ला सुरुवात होत असून, सलग तीन दिवस 'फिल्म एक्स्पो'चे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवसाची सुरुवात भव्य आणि ग्लॅमरसफिल्म अवॉर्ड नाईटने होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात 'नाफा जीवन गौरव पुरस्कार' नेमका कोणत्या कलावंताला दिला जाणार? याविषयी विशेष औत्सुक्य निर्माण झाले आहे.

हॉलिवूडमधील प्रतिष्ठित कॅलिफोर्निया थिएटरमध्ये अंथरले गेलेले 'रेड कार्पेट', झगमगते कॅमेरे आणि प्रकाशझोतात आलेले मराठी कलाकारया अविस्मरणीय दृश्यातून मराठी चित्रपटांची अमेरिकावारी किती प्रभावी ठरत आहे, हे स्पष्ट होते. 'नाफा'च्या या तेजस्वी 'फिल्म अवॉर्ड नाईट'मुळे संपूर्ण सॅन होजे शहर उत्सवमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. हॉलिवूड नगरीने मराठी तारे-तारकांसाठी रेड कार्पेट अंथरून आपले स्वागताचे दार खुले केले आहे.

मान्यवरांची उपस्थिती आणि स्वयंसेवकांची सज्जता

यंदाच्या महोत्सवात महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, महेश कोठारे, गजेंद्र अहिरे, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी, संध्या गोखले, स्वप्नील जोशी, अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर यांसारख्या अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या कलाकारांच्या स्वागतासाठी नाफा टीमचे पदाधिकारी आणि सदस्य - रिया ठोसर, अरुंधती दात्ये, अर्चना सराफ, डॉ. गौरी घोलप, अनूप निमकर, विनायक फडणवीस, वृषाली मालपेकर, योगी पाटील, लक्ष्मण आपटे, गौरी कुलकर्णी, निरंजन पागे, हर्षा, पूजा, निमा, मनीष आणि मानसी देवळेकर - यांच्यासह अमेरिकेतील शेकडो स्वयंसेवक, कलाकार आणि तंत्रज्ञ सज्ज झाले आहेत.

गेल्यावर्षीपासून 'नाफा मराठी चित्रपट महोत्सव' कॅलिफोर्नियातील सॅन होजे शहरात मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. यंदा या महोत्सवाची दखल थेट अमेरिकेच्या संसद भवनाने घेतली आहे. अमेरिकेतील मराठी वंशाचे खासदार श्री. ठाणेदार यांनी नुकतेच संसदेच्या सभागृहात या महोत्सवाबद्दल गौरवपूर्वक माहिती दिली.

अधिक माहितीसाठी सविस्तर कार्यक्रम वेळापत्रकासाठी: https://northamericanfilmassociation.org


NAFA, North American Marathi Film Association, Marathi Film Festival, San Jose, Hollywood, Abhijeet Gholap, Marathi Culture, Film Award Night, Jeevan Gaurav Puraskar, Cultural Ceremony, American Parliament, Artists

#NAFA #NAFA2025 #MarathiFilmFestival #Hollywood #Sanhoje #AbhijitGholap #MarathiCulture #FilmAwardNight #LifetimeAward #AmericanCongressman #MarathiArtist


हॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांचा जल्लोष! 'नाफा २०२५' महोत्सवाचा दिमाखदार सोहळा 'द कॅलिफोर्निया थिएटर'मध्ये सुरू हॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांचा जल्लोष! 'नाफा २०२५' महोत्सवाचा दिमाखदार सोहळा 'द कॅलिफोर्निया थिएटर'मध्ये सुरू Reviewed by ANN news network on ७/२६/२०२५ ०३:५४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".