यामुळे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना आता या पोर्टलद्वारे इंटर्नशिप आणि नोकरीच्या संधी सहजपणे शोधता येणार आहेत. तसेच, सार्वजनिक, खासगी, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय संस्था आणि औद्योगिक आस्थापनांना देखील विद्यापीठातील होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. या संस्था आणि आस्थापना या पोर्टलवर नोंदणी करून त्यांना लागणाऱ्या मनुष्यबळाची गरज नोंदवू शकतील. मुंबई विद्यापीठाने सुरू केलेले हे नवे प्रारूप विद्यार्थी आणि संभाव्य नियोक्ते या दोघांसाठीही एक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम व्यासपीठ म्हणून उपलब्ध होईल.
मुंबई विद्यापीठाच्या करिअर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलने (सीटीपीसी) या मॉड्यूलसाठी पुढाकार घेतला आहे. विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, संचालक, प्लेसमेंट समन्वयक आणि उद्योग क्षेत्राशी वेळोवेळी समन्वय साधून सीटीपीसी या प्रारूपाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील राहणार आहे. गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ मिळवण्यास इच्छुक असलेल्या संस्था
Mumbai University, e-Samarth Portal, Internships, Job Opportunities, National Education Policy, Career Training & Placement Cell, Student Placement
#MumbaiUniversity #eSamarthPortal #Internship #JobOpportunities #NationalEducationPolicy #StudentPlacement #CareerDevelopment #HigherEducation
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: