पुणे, १० जुलै २०२५: पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यापुढे दर शनिवारी पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 'तक्रार निवारण दिन' आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत नागरिक थेट पोलीस उप-आयुक्त आणि सहायक पोलीस आयुक्तांकडे आपल्या तक्रारी मांडू शकणार आहेत.
पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी त्यांचे अधिपत्याखालील प्रादेशिक अपर पोलीस आयुक्त, परिमंडळीय पोलीस उप-आयुक्त, विभागीय सहायक पोलीस आयुक्त आणि पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दर शनिवारी आपापल्या हद्दीतील नागरिकांच्या समस्या/तक्रारींचे निवारण करण्यासाठी "तक्रार निवारण दिन" आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत.
याच अनुषंगाने, येत्या शनिवारी, दिनांक १२ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या कालावधीत खालील नमूद पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उप-आयुक्त आणि सहायक पोलीस आयुक्त स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निवारण करतील:
ज्या पोलीस स्टेशनला सहायक पोलीस आयुक्त किंवा पोलीस उप-आयुक्त उपस्थित नसतील, त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे तक्रार निवारण दिनाची प्रक्रिया पूर्ण करतील. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांचे तक्रार अर्ज पोलीस स्टेशनमध्ये प्रलंबित असल्यास त्यांनी या दिवशी उपस्थित राहावे.
Public Grievance, Community Policing, Pune Police Initiative
#PunePolice #TarkrarNivaranDin #PublicGrievance #CommunityPolicing #PuneNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: