भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनचे आषाढी एकादशीनिमित्त आयोजन
पुणे: भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत, तसेच संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 'अभंगरंग' या अभंग गायनाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे होणार आहे.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. गुरुकुलच्या युवा गायिका अनुष्का साने, रसिका पैठणकर आणि नुपूर देसाई अभंग गायनात सहभागी होणार आहेत. त्यांना गीत इनामदार, आकाश नाईक, आकाश तुपे आणि आनंद टाकळकर हे साथसंगत करतील. या कार्यक्रमाचे निरुपण ह.भ.प. मानसी बडवे करणार आहेत.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २५१ वा विशेष कार्यक्रम आहे. भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली असून, सर्व रसिकांना या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असल्याचे स्पष्ट केले आहे. पुणेकरांनी या अनोख्या अभंग गायनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Cultural Event, Abhang Singing, Pune, Music, Ashadhi Ekadashi, Free Event
#Abhangarang #PuneEvents #AshadhiEkadashi #BVB #InfosysFoundation #MarathiMusic #CulturalProgram #PuneCulture #FreeEntry

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: