राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे उरणमध्ये पाककला स्पर्धेचे यशस्वी आयोजन

 


महिलांचा उत्तम प्रतिसाद, कलागुणांना मिळाला वाव

उरण, २२ जुलै २०२५: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच महिला व बालविकास मंत्री   अदिती तटकरे व  आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली, जिल्हा महिला अध्यक्षा उमा मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली खासदार  सुनील  तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त "पाककला स्पर्धा २०२५" उरण तालुक्यातील चिरनेर गावातील पी.पी.खारपाटील हायस्कूल व कॉलेज येथील हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या पाककला स्पर्धेला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, सर्वच स्तरातून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

प्रमुख अतिथी आणि उपस्थिती

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महिला अध्यक्षा उमा  मुंढे, जिल्हा महिला उपाध्यक्षा प्रतिमा जाधव, उरण तालुका अध्यक्षा कुंदा ठाकुर, उरण तालुका उपाध्यक्षा सुमिता तुपेकर, प्राध्यापिका सुलोचना सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्त्या भारती   कटेकर, उज्ज्वला  ठाकुर, सुगंधा   कडू, कामिनी   ठाकुर, चिर्ले ग्रामसंघ बचतगट अध्यक्षा विश्रांती  घरत, साक्षी  धुमाळ, सि.डी.पी.ओ. पल्लवी भोईर, उरण तालुका अध्यक्ष परिक्षीत  ठाकुर, उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकुर उपस्थित होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचीही मोठी उपस्थिती होती.

स्पर्धेचे स्वरूप आणि पदार्थ

स्पर्धेचे सूत्रसंचालन श्याम ठाकुर यांनी केले, तर परिक्षक म्हणून जिल्हा महिला उपाध्यक्षा प्रितमताई जाधव यांनी भूमिका पार पाडली. पाककला स्पर्धेत शेवग्याचे पकोडे, कडीपत्ता चटणी, मिक्स थालीपीठ, केशर फालुदा, चिंबोऱ्या लॉलीपॉप, रव्वा आप्पे, तांदुळाचे लाडू, भाकरी, चिकन, ओले वाटण, तांदळाची खीर आदी पदार्थ महिला भगिनींनी इतके चविष्ट बनवले होते की परिक्षकांना कुणाला बक्षीस द्यावे असा प्रश्न पडला होता.

सहभागी स्पर्धक आणि विजेते

एकूण ४३ स्पर्धकांनी या पाककला स्पर्धेत सहभाग घेतला. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

  • प्रथम क्रमांक: सौ. स्नेहा नितीन ठाकुर (चिरनेर)

  • द्वितीय क्रमांक: सौ. राणी सागर ठाकुर (धुतूम)

  • तृतीय क्रमांक: सौ. प्रणाली प्रविण घरत (धुतूम)

  • उत्तेजनार्थ: सौ. अर्पिता जगदिश जोशी (चिरनेर), सौ. ज्योती सुरेश म्हात्रे (चिरनेर), सौ. आश्विनी ज्ञानेश्वर ठाकुर (धुतूम)

महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन

पाककला स्पर्धा कार्यक्रम पार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सहकारी मित्र-मैत्रिणींचे मोलाचे सहकार्य लाभले. पी.पी.खारपाटील हायस्कूल व कॉलेजने हॉल, माईक सिस्टिम, टेबल आणि खुर्च्यांची व्यवस्था केली. एकंदरीत पाककला स्पर्धा २०२५ मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादासह संपन्न झाली. सदर पाककला स्पर्धेतून महिलांच्या कलागुणांना, कौशल्यांना मोठ्या प्रमाणात वाव मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महिलांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्याच्या या उपक्रमातून नवनवीन महिला उद्योजक तयार होण्यासाठी हातभार लागणार आहे, त्यामुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.


Uran, Cooking Competition, NCP, Nationalist Congress Party, Women Empowerment, Aditi Tatkare, Sunil Tatkare, Community Event, Maharashtra, Chirner

 #CookingCompetition #Uran #NCP #WomenEmpowerment #AditiTatkare #SunilTatkare #Maharashtra #PakakalaSpardha #Chirner

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे उरणमध्ये पाककला स्पर्धेचे यशस्वी आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे उरणमध्ये पाककला स्पर्धेचे यशस्वी आयोजन Reviewed by ANN news network on ७/२२/२०२५ ०९:५१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".