धुळे, दि. २५ जुलै २०२५: अधिक दूध मिळावे यासाठी दुभत्या म्हशींना दिले जाणारे आणि मानवी आरोग्यास हानिकारक असलेले ऑक्सिटोसिन (Oxytocin) इंजेक्शनची चोरटी वाहतूक करणाऱ्या मालेगावच्या एका इसमाला धुळे शहरात नुकतेच रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याकडून रिक्षासह एकूण ८७ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांची कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील अब्दुल सलाम निसार अहमद (संशयित आरोपी) हा ऑक्सिटोसिन इंजेक्शनच्या बॉक्सची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक नितीन करंडे, पंकज चव्हाण आणि रमेश शिंदे हे गस्त घालत असताना, त्यांनी रिक्षावर छापा टाकला.
या छाप्यात पोलिसांनी रिक्षासह इंजेक्शनचे खोके असा ८७ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन करंडे हे करत आहेत.
Dhule, Oxytocin Injection, Smuggling, Malegaon, Dairy Buffalo, Human Health, Illegal Trafficking, Police Action, Crime
#Dhule #Oxytocin #InjectionSmuggling #IllegalTrafficking #PoliceAction #Malegaon #MilkProduction #HumanHealth #Crime

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: