पुणे, ०६ जुलै २०२५: पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-६ ने फॉर्च्युनर वाहन भाड्याने घेण्याच्या बहाण्याने अपहार करून फसवणूक करणाऱ्या दोघा आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी छत्रपती संभाजीनगर येथून अशाच प्रकारे एका इटियॉस कारचाही अपहार केल्याचे कबूल केले आहे.
युनिट ६ कडील पोलीस अंमलदार सचिन पवार यांना दि. ०५/०७/२०२५ रोजी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गु. र. क्रं. ४०९/२०२४, भा.द.वि. कलम ४०६, ४२० या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आकाश रमेश पवार (वय २४, रा. फकीर जवळा, ता. धारूर, जि. बीड) हा केसनंद, वाघोली, पुणे येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस अंमलदार ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सारंग दळे, शेखर काटे आणि सुहास तांबेकर यांच्या पथकाने सापळा रचून आकाश पवारला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या कसून चौकशीत त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार किरण सुंदर घायाळ (वय ३२, रा. उरुळी देवाची, पुणे) याच्यासोबत केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी किरण घायाळला उरुळी देवाची येथून ताब्यात घेतले.
तपासात आरोपींनी अपहार केलेले फॉर्च्युनर वाहन आणि छत्रपती संभाजीनगर येथून अपहार केलेली इटियॉस कार (क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेला गुन्हा) ही दोन्ही वाहने मालेगाव, नाशिक येथे विकल्याची कबुली दिली आहे.
ही कारवाई निरीक्षक वाहिद पठाण, आणि अंमलदार सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सारंग दळे, शेखर काटे व सुहास तांबेकरे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
Vehicle Fraud, Car Theft, Pune Police, Crime Branch, Arrest
#PuneCrime #VehicleFraud #FortunerScam #PoliceArrest #PunePolice #CrimeBranch #VehicleTheft

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: