आषाढी एकादशीच्या तयारीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात घेतला आढावा (VIDEO)


पंढरपूर, ४ जुलै २०२५: अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पंढरपूर येथील तयारीचा सविस्तर आढावा घेतला. वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सोयी-सुविधा आणि श्री विठ्ठल मंदिर परिसरातील व्यवस्थेची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. प्रशासनाला चोख नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.   

या दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन आणि प्रकाश आबिटकर उपस्थित होते. त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मुखदर्शन घेतलं. मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री शिंदे यांचा शाल आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.   

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. उपमुख्यमंत्र्यांनी या कामांचीही पाहणी केली. आषाढी एकादशीसाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.   

Pandharpur, Ashadhi Ekadashi, Eknath Shinde, Temple Preparation, Pilgrimage, Maharashtra Government, Vitthal Rukmini Temple

 #AshadhiEkadashi #Pandharpur #EknathShinde #VitthalTemple #Wari #Maharashtra #TemplePreparation #Pilgrimage

 


आषाढी एकादशीच्या तयारीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात घेतला आढावा (VIDEO) आषाढी एकादशीच्या तयारीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात घेतला आढावा (VIDEO) Reviewed by ANN news network on ७/०४/२०२५ ०३:३७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".