पंढरपूर: आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी श्री विठ्ठलाचे आजपासून (२७ जून २०२५) २४ तास दर्शन सुरू झाले आहे. परंपरेनुसार आषाढ महिना सुरू झाल्यावर आज विठोबाचा पलंग काढण्यात आला. या काळात विठोबाचे नवरात्र बसते असे मानले जाते.
पलंग काढल्यानंतर विठोबाचे सर्व राजोपचार बंद करून भाविकांसाठी २४ तास दर्शन सुरू करण्यात आले आहे. हे २४ तासांचे दर्शन आषाढी एकादशीनंतर १६ जुलै रोजी होणाऱ्या प्रक्षाळ पूजेपर्यंत सुरू राहणार आहे.
आषाढी एकादशीनिमित्त, मंदिर समितीच्या वतीने ५० हजार भाविकांच्या क्षमतेची दर्शन रांग उभारण्यात आली आहे. सर्वसामान्य भाविकांना २४ तास सहज दर्शन घेता यावे यासाठी आता व्हीआयपी दर्शन आणि ऑनलाईन दर्शन बुकिंग व्यवस्था तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
Ashadhi Ekadashi, Vitthal Temple, Pandharpur, 24-hour Darshan, Pilgrimage, Maharashtra, Temple Rituals, Devotion, VIP Darshan Cancelled
#AshadhiEkadashi #VitthalDarshan #Pandharpur #Pilgrimage #Maharashtra #TempleNews #Devotion #24HourDarshan #VitthalRukmini

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: