आत्मनिर्भर कॉन्सेप्टस इंडिया प्रा. लि. कंपनीकडून ४३ गुंतवणूकदारांची साडेतीन कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल
पुणे, २० जून २०२५:
पुणे शहरात 'आत्मनिर्भर कॉन्सेप्टस इंडिया प्रा. लि.' या कंपनीने ४३ गुंतवणूकदारांची तब्बल ३ कोटी ४८ लाख ९२ हजार ५२५ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीने सन २०२२ ते सन २०२४ या कालावधीत लोकांचा विश्वास संपादन करून गुंतवणुकीवर ८ ते ९ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे
या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात कंपनीविरोधात भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ सह एमपीआयडी कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
आर्थिक गुन्हे शाखेने, नमूद ४३ गुंतवणूकदारांव्यतिरिक्त 'आत्मनिर्भर कॉन्सेप्टस इंडिया प्रा. लि.' मध्ये ज्यांची आर्थिक फसवणूक झाली असेल, अशा सर्व व्यक्तींना आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे
------------------------------------------------------------------------------------------------------
Pune, Financial Fraud, Atmanirbhar Concepts India Pvt. Ltd., Investment Scheme, Economic Offenses Wing, Crime Branch, Investors, Cheating, Bandgarden Police Station
#PuneFraud #FinancialCrime #InvestmentScam #AtmanirbharConcepts #EconomicOffensesWing #PunePolice #InvestorAlert

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: