याप्रकरणी अक्षयची आई, वंदना संजय ठोके (वय ४५, रा. साई कृपा हौसिंग सोसायटी, विठ्ठलनगर, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून आरोपीला अटक केली आहे. विश्वास भिमाशिंदे (वय २८, रा. साई कृपा हौसिंग सोसायटी, विठ्ठलनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा अक्षय ठोके याचा मृतदेह १ जून रोजी सकाळी सोसायटीच्या पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून अक्षयच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने गंभीर वार करून त्याला जीवे ठार मारले होते.
घटनेची माहिती मिळताच संत तुकारामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी तपासादरम्यान आरोपी विश्वास शिंदे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.
संत तुकारामनगर पोलिसांनी आरोपी विश्वास शिंदे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (खून) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुंभार करत आहेत.
----------------------------------------------------------------------------------------------
#PimpriCrime #Murder #Vitthalnagar #Arrest #Homicide #PunePolice
Reviewed by ANN news network
on
६/०२/२०२५ ०४:२७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: