पिंपरीतील एच.ए. कंपनीजवळ तरुणांवर कोयता, चाकूने वार; दोन आरोपी अटकेत

 


पिंपरी चिंचवड: पिंपरी येथील संत तुकाराम नगरमध्ये एच.ए. कंपनी कॅम्पसजवळील एका खेळण्याच्या जागेत पुल टेबल गेम खेळण्यासाठी गेलेल्या तरुणांवर जुन्या भांडणाच्या कारणावरून लोखंडी कोयता, चाकू, लाकडी दांडके आणि काठीने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात फिर्यादी आणि त्याचा मित्र गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी फिर्यादी अरमान अजीज सय्यद (वय २२ वर्षे, रा. शंकर मंदिराजवळ, गंगानगर, संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी तक्रार दिली आहे. आरोपींमध्ये वसिम शाबीर सय्यद (वय २६ वर्षे, रा. खराळवाडी, पिंपरी पुणे), जावेद शाबीर सय्यद (वय २७ वर्षे, रा. खराळवाडी, पिंपरी पुणे), रोहीत कसबे (वय २७ वर्षे, रा. खराळवाडी, पिंपरी पुणे), फरमान सैफी (वय २४ वर्षे, रा. खराळवाडी, पिंपरी पुणे) आणि लाला पठाण (वय ३० वर्षे, रा. देहूरोड, पुणे) यांचा समावेश आहे. आरोपी क्रमांक २ (जावेद शाबीर सय्यद) आणि ४ (फरमान सैफी) यांना अटक करण्यात आली आहे.

दि. ०६/०६/२०२५ रोजी रात्री ०८:३० वाजण्याच्या सुमारास एच.ए. स्कुल समोर, पि.बी.ए. स्पोर्ट ग्राऊंड, वेलफेअर सेंटर, एच.ए. कंपनी कॅम्पस, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे ही घटना घडली. फिर्यादी अरमान सय्यद आणि त्यांचे मित्र यासीन सादीक सय्यद, साद अश्फाक शेख हे पुल टेबल गेम खेळण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीला आणि त्याला घरी घेण्यासाठी आलेल्या अथर्व उर्फ मोन्या गंधुरे या मित्राला जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कोयता, चाकू, लाकडी दांडके व काठीने, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.

या प्रकरणी संत तुकाराम नगर स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक १६३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९(१) (गुन्हेगारी कट), ११५ (२) (गुन्हा करण्यासाठी प्रोत्साहन), ३५२ (गैरहल्ला), १९१(१), १९१(२), १९१ (३), १९० (सार्वजनिक उपद्रव), भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) (अवैध शस्त्र बाळगणे) आणि महाराष्ट्र अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ (मनाई आदेशाचा भंग) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास उपनिरीक्षक कुंभार करत आहेत.

  • -------------------------------------------------------------------------------------------------------------------- Crime, Assault, Attempted Murder, Pimpri Chinchwad, Gang Violence, Arrest
  •  #PimpriChinchwadCrime, #Assault, #AttemptedMurder, #PoliceAction, #GangViolence
पिंपरीतील एच.ए. कंपनीजवळ तरुणांवर कोयता, चाकूने वार; दोन आरोपी अटकेत पिंपरीतील एच.ए. कंपनीजवळ तरुणांवर कोयता, चाकूने वार; दोन आरोपी अटकेत Reviewed by ANN news network on ६/०८/२०२५ ०४:१७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".