थेरगाव: थेरगावमधील पडवळनगर येथे एका तरुणावर ब्लेडने हल्ला करण्यात आला. समद सादिक शेख (वय २१) याच्यावर साहिल पठाण याने ब्लेडने वार केले.
आरोपीने फिर्यादीकडे पाणी मागितले असता, "तुझे तू घे, मी तुझ्या बापाचा नोकर नाही" असे म्हटल्याने आरोपीने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या मानेवर, डाव्या हातावर आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शंतनु नाईकनिंबाळकर तपास करत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा