'यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थे'तर्फे कर्जत-खांडसच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

 


उरण, दि. २७ जून २०२५: पनवेल तालुक्यातील शेलघर येथील 'यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थे'तर्फे कर्जत-खांडस येथील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. उद्योजक मयुरेश चौधरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दफ्तर आणि सुंदर छत्रीचे वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम भीमाशंकरच्या पायथ्याशी असलेल्या 'वक्रतुंड रिसॉर्ट'मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी पहिली ते दहावीचे सुमारे २०० विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि पालक उपस्थित होते. उपस्थित सर्वांना नाश्ता देण्यात आला.

शिक्षण आणि समाजसेवेचे महत्त्व

यावेळी बोलताना  कामगार नेते महेंद्र  घरत म्हणाले, "आईच्या नावाने सुरू केलेल्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे आजपर्यंत अनेक लोकोपयोगी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यात रुग्णवाहिका, कॉम्प्युटर वाटप, अनेक विद्यार्थी दत्तक घेऊन पालकत्व स्वीकारले आहे."

ते पुढे म्हणाले, "दरवर्षी कर्जत-खांडस येथील ग्रामीण विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नयेत यासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामागे गरिबातला गरीब विद्यार्थी शिकला पाहिजे, हीच माझी प्रामाणिक भूमिका आहे. येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल आयोजित केली जाईल."

नवीन दफ्तर आणि छत्री पाहून विद्यार्थी आपल्या विश्वात हरकून गेले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव पाहून मयुरेश चौधरी आणि महेंद्रशेठ घरत यांना विशेष आनंद झाला.

यावेळी आंबेरपाडा येथील ग्रामपंचायत सरपंच सचिन लोखंडे, यशवंत ढोंगे, वैभव पाटील, किरीट पाटील आणि एम. जी. ग्रुप टीम उपस्थित होती.


 Yamuna Social and Educational Institute, Educational Material Distribution, Karjat-Khandas Students, Philanthropy, Mayuresh Chaudhary, Mahendrasheth Gharat, Rural Education, Community Service

#YamunaInstitute #EducationForAll #KarjatKhandas #StudentSupport #CommunityService #RuralEducation #Philanthropy #Maharashtra #MahendrashethGharat #MayureshChaudhary

'यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थे'तर्फे कर्जत-खांडसच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 'यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थे'तर्फे कर्जत-खांडसच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Reviewed by ANN news network on ६/२७/२०२५ ०३:४५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".