वाकड (पिंपरी चिंचवड): कस्पटे चौकाजवळील बंद पुलावर देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक केली आहे.
सोमवार संध्याकाळी साडेसातच्या सुमारास वाकड पोलिसांनी ही धक्कादायक कारवाई केली. प्रणव प्रकाश शेवाळे (वय २० वर्षे, रा. वनदेव नगर, थेरगाव) आणि औदुंबर उर्फ मोन्या रविंद्र नाकते (वय २९ वर्षे, रा. गोखले नगर, पुणे) या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी त्यांच्याकडून ४०,००० रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि १,००० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. या पिस्तुलावर केंद्र शासनाच्या नियमांनुसार निर्मात्याचे नाव, क्रमांक किंवा ओळख चिन्हे नव्हती.
हवालदार वंदु दत्तात्रय गिरे (वय ४२ वर्षे, वाकड स्टेशन) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी गुन्हा क्रमांक २६१/२०२५ नोंदवण्यात आला आहे. भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ३, २५ (अवैध शस्त्र बाळगणे), महाराष्ट्र अधिनियम ३७(१) सह १३५ (मनाई आदेशाचा भंग) आणि भारतीय न्याय संहिता कलम ३(४) (गुन्हेगारी कट) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सध्या उपनिरीक्षक सावर्डे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
- ---------------------------------------------------------------------------------------------------------------- Illegal Arms, Pistol, Ammunition, Arrest, Pimpri Chinchwad, Wakad, Police Action
- #IllegalArms, #WakadCrime, #PistolSeizure, #PimpriChinchwad, #Arrest
Reviewed by ANN news network
on
६/११/२०२५ ०८:००:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: