पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी सोहळ्याची 'शिव महाआरती'ने सांगता

 


पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित त्रिशताब्दी समारोहाची सांगता ३१ मे रोजी सायंकाळी भक्तिमय वातावरणात झाली. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिरात महिलांच्या हस्ते भव्य ‘शिव महाआरती’चे आयोजन करण्यात आले होते. या आठ दिवसीय सोहळ्याची सांगता याच महाआरतीने झाली.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दीचे संयोजक विजय (शीतल) शिंदे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, माजी उपमहापौर केशव घोळवे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, माजी नगरसेविका निर्मला कुटे, जयनाथ काटे, सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, कुंदा भिसे, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, उपाध्यक्ष कैलास सानप, बिभीषण चौधरी, मंडलाध्यक्ष अनिता वाळुंजकर, संदेश काटे, माजी मंडलाध्यक्ष सोमनाथ भोंडवे, सामाजिक कार्यकर्ते दिपक भोंडवे, महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली खाडये, गणेश वाळुंजकर, गणेश आर. ढाकणे, मनोज ब्राम्हणकर, अभिजित बोरसे, भुषण जोशी, सत्यनारायण चांडक, सीमा चव्हाण, ज्ञानेश्वर हांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे स्मरण केले आणि उपस्थितांचे आभार मानले. महिलांच्या हस्ते झालेली शिव महाआरती विशेष उल्लेखनीय ठरली, असे त्यांनी सांगितले. अहिल्यादेवींच्या विचारांना समाजात रुजवण्यात या सोहळ्याने मदत केली, असेही ते म्हणाले.

भाजप प्रदेश कार्यालयातर्फे प्रत्येक जिल्हास्थानी कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, विधान परिषद आमदार उमा खापरे, अमित गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभांमधील १४ मंडळांमध्ये २४ ते ३१ मे २०२५ दरम्यान अहिल्यादेवी जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यात नदी घाट स्वच्छता, वत्कृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, परिसंवाद आणि पुरस्कार सोहळे यांसारखे विविध उपक्रम झाले. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय (शीतल) शिंदे यांनी केले आणि आभार मोरेश्वर शेडगे यांनी मानले.

---------------------------------------------------------------------------------------------------------- #AhilyadeviHolkar #PimpriChinchwad #Maharashtra #BJP #Celebration #SocialEvent #ShivMahaAarti #300thAnniversary

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी सोहळ्याची 'शिव महाआरती'ने सांगता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी सोहळ्याची  'शिव महाआरती'ने सांगता Reviewed by ANN news network on ६/०१/२०२५ ०४:०२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".