महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते मंडणगडात पाच नव्या एसटी बसेसचे लोकार्पण

 


रत्नागिरी, दि. २१ जून २०२५ :मंडणगड एसटी आगारात आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, खेड आगार, रत्नागिरी विभागामार्फत नव्याने खरेदी करण्यात आलेल्या पाच एसटी बसेस सेवेत दाखल झाल्या. या नव्या बसेसचे लोकार्पण महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते मंडणगड आगारात मोठ्या उत्साहात पार पडले.

यावेळी बोलताना महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी माहिती दिली की, परिवहन विभागामार्फत पुढील टप्प्यात कोकणासाठी आवश्यक असलेल्या मिनी बसेसचा ताफा लवकरच जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे खेडोपाडी आणि दुर्गम भागातील प्रवास अधिक सोयीचा जलद होईल, असे त्यांनी सांगितले. "कोकणातील शेवटच्या गावापर्यंत वाहतूक सेवा पोहोचवण्यासाठी नव्या बसेसचा ताफा ही केवळ सुरुवात आहे. आगामी काळात मिनी बसेसचाही ताफा उपलब्ध करून देण्यात येईल," असे श्री. कदम म्हणाले.

या उपक्रमामुळे मंडणगड परिसरातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर होणार असून, ग्रामीण भागातील दळणवळणाला चालना मिळणार आहे. या नव्या बसेसच्या समावेशामुळे स्थानिक प्रवाशांसाठी अधिक सक्षम, जलद आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध होणार आहे.

या लोकार्पण सोहळ्याला प्रताप घोसाळकर, अस्मिता केंद्रे, सुरेश दळवी, हरिश्चंद्र कोदेरे, इरफान बुरोंडकर, संजय शेडगे, दीपक मालुसरे, आनंद भाटे, विनोद जाधव, चेतन सातोपे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 Ratnagiri, Mandangad, ST Buses, Inauguration, Yogesh Kadam, Minister of State for Revenue, MSRTC, Khed Depot, Mini Buses, Rural Connectivity, Public Transport, Konkan.

 #Ratnagiri #Mandangad #STBuses #YogeshKadam #MSRTC #Konkan #PublicTransport #RuralDevelopment


महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते मंडणगडात पाच नव्या एसटी बसेसचे लोकार्पण महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते मंडणगडात पाच नव्या एसटी बसेसचे लोकार्पण Reviewed by ANN news network on ६/२१/२०२५ १०:३६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".